प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रात्र वैऱ्याची, जागते रहो.. उमेदवारांची कार्यकर्त्यांना सावधान राहण्याची सुचना
गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार असून रात्र वैऱ्याची आहे, जागे रहा असा सल्ला उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरणे, प्रचारसभा, प्रचारफेऱ्या यांनी निवडणूकीचे वातावरण पेटले होते. प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. सुमारे ३४ दिवस ही प्रचार यंत्रणा राबल्यानंतर आज सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आज रात्रीपासून छुप्या प्रचाराला सुरुवात होणार असून कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदार संघात 1 हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List