उद्योगनगरीत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान; मागील तीन विधानसभा निवडणुकीत 61 टक्क्यांच्या पुढे मतदान नाही

उद्योगनगरीत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान; मागील तीन विधानसभा निवडणुकीत 61 टक्क्यांच्या पुढे मतदान नाही

चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन मतदारसंघातील आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिल्यास हा आकडा आजपर्यंत कधीच 61 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. दुसरीकडे डोंगराळ आणि दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेल्या मावळातील मतदार 65 टक्क्यांच्या पुढे मतदान करीत आला आहे.तीन विधानसभा निवडणुकीतील मतदान करीत आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्ण भाग पूर्वी हवेली मतदारसंघात समाविष्ट होता. 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमधील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक मतदान 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात 60.92 टक्के झाले होते. याव्यतिरिक्त कधीही मतदानाची टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने मोहीम राबविली होती. त्यामुळे मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती. शाळा आणि महाविद्यालयामध्येही मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली होती.

पिंपरी पन्नाशी ओलांडत नाही

शहरातील सर्वांत लहान मतदारसंघ पिंपरी आहे. पिंपरीतील मतदानाची आकडेवारी सर्वांत कमी आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 50.21 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले होते. याचाच अर्थ, या मतदारसंघातील निम्मे मतदार मतदानाचा अधिकार बजावत नाहीत. ही टक्केवारी वाढणे खूप गरजेचे आहे. परंतु, समाधानाची बाब अशी की प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढताना दिसत आहे.

मतदारसंघ मोठा, मात्र मतदान सर्वात कमी

 चिंचवड हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या पुढे असते. या मतदारसंघात2014 साली सर्वाधिक 56.30 टक्के इतके मतदान झाले होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर २०२३ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आसपास होती. या मतदारसंघात मोठ्या वेगाने मतदारसंख्या वाढत असताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसत नाही.

भोसरीत 2014 मध्ये 60 टक्के

भोसरी मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये काहीशी जागृती झाली असल्याचे दिसून येत आहे. 2009 मध्ये या मतदारसंघात केवळ48.17 टक्के मतदान झाले होते. 2014 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान 60.92 टक्के या मतदारसंघात नोंदविले गेले. 2019 मध्ये हाच आकडा59.71 टक्क्यांवर खाली आला.

मावळातील मतदार मतदानाबाबत सजग

शहराला जोडून असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दयांचा दुर्गम असा आहे. तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान 2009 मध्ये झाले होते. तेही 65.41 टक्के इतके होते. या आकड्यांपर्यंत पिंपरी- चिंचवड शहरातील एकही मतदारसंघ पोहोचू शकलेला नाही. मावळ मतदारसंघात 2014 आणि 2019 मध्ये 71 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
मालाड पूर्वेला पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दिंडोशीतील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार...
शेजारी हनुमान चालीसा,चेहऱ्यावर मोठी पट्टी; अपघातानंतर कश्मीरा शाहाचा पहिला फोटो समोर
घटस्फोट जाहीर करताना वापरलेल्या हॅशटॅगवरून ए. आर. रेहमान ट्रोल; नेटकरी म्हणाले..
दर्ग्याला भेट दिल्यामुळे राम चरण वादाच्या भोवऱ्यात, बायको म्हणाली, ‘तो स्वतःच्या धर्माचं पालन करतो आणि…’
अशोक सराफ चित्रपटात आपल्या शर्टची दोन बटणं का उघडे ठेवतात? यामागे आहे खूपच रंजक कारण
दूध आणि दही खाण्याचा कंटाळा आला असेल तर, करा या पदार्थांचे सेवन
रात्री लवकर जेवण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या