गुजरातमध्ये 700 किलो ड्रग जप्त, 8 इराणी नागरिकांना अटक
नौदल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी संयुक्त कारवाई करत गुजरातमधून ड्रग्ज जप्त केले आहे. पोरबंदर किनारपट्टीवर इराणी बोटीतून 500 किलोहून अधिक ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी आठ इराणींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 700 किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेच्या रडारखाली ड्रग्ज आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी अंमली पदार्थविरोधी कारवाई सुरू करण्यात आली.
याआधी 29 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद विमानतळावर 2.11 कोटींचा 1.75 किलो हायब्रीड गांजा जप्त करण्यात आला होता. भारतात गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली. चार आरोपी थायलंडहून विमानाने अहमदाबादला आले होते. तर अन्य तिघे या चौघांना आणि गांजाची खेप घेण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List