धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, 2019 ला दिलेली तिघांचीच माहिती’ वाचा त्यांच्या शपथपत्रातील धक्कादायक माहिती
राज्याचे कृषीमंत्री व परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी 2019 च्या निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात तीन मुलं असल्याची माहिती दिली होती. दरम्यान आता 2024 च्या निवडणूकीसाठी त्यांनी दिलेल्या शपथपत्रात त्यांनी पाच मुलांचा उल्लेख केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अजित पवार गटाकडून परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात त्यांनी पाच अपत्यांचा उल्लेख केला आहे. वैष्णवी मुंडे, जान्हवी मुंडे, आदीश्री मुंडे, सिशिव मुंडे, शिवानी मुंडे अशी त्या पाच मुलांची नावे आहेत.
पाच वर्षांत संपत्ती दुप्पट
धनंजय मुंडे यांच्यांकडे 2019 मध्ये 23 कोटी संपत्ती होती. 2024 च्या शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे 53.80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List