जीवनदायी सेवाकार्याला एक तप पूर्ण, बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान उपक्रम
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार रक्तदानासारख्या जीवनदायी सेवाकार्यातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी वरळी येथील शिवसेना शाखेत दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. जाती-पातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला 17 नोव्हेंबरला आता 12 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो पिशव्या रक्तसंकलन करण्यात आल्या असून हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. शिवसैनिक आणि हिंदुस्थानच्या काळजावर काळाने जणू आघात केला होता. बाळासाहेबांची स्मृती अखंड राहावी आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी दर महिन्याच्या 17 तारखेला वरळी नाका येथील शिवसेना शाखेत रक्तदान शिबीर आयोजित करून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्या त्या महिन्याच्या 17 तारखेला काही वेळा अगदी होळी, दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवादिवशीही रक्तदान शिबीर सुरू आहे. विशेष म्हणजे, रक्तदान शिबिराचा हा उपक्रम कोरोना काळातही सुरू राहिला.
रक्तदानाचे कार्य अखंड सुरू राहणार
येत्या रविवारी 17 नोव्हेंबरला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 12 वा स्मृतिदिन आहे. या दिवशीही वरळी नाका येथील शिवसेना शाखेत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अरविंद भोसले यांनी दिली. या शिबिरासाठी 9821581860 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. रक्तदानाचे हे सामाजिक कार्य यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील, असे रक्तदान शिबिराचे आयोजक अरविंद भोसले यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List