हरभरा आयात करण्याचे सरकारचे धोरण शेतकऱ्यांसाठी फासाचा दोर, आमदार कैलास पाटील यांचा घणाघात
केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. सोयाबीन आयातीनंतर आता केंद्र सरकारने हरभरा बाजारात येण्यापुर्वीच ऑस्ट्रेलियातून हरभरा आयात करण्याचे धोरण राबवले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्य़ांना बसणार असून सात हजार भाव असणारा हरभरा जानेवारीत आयात झाल्यानंतर मातीमोल भावाने जाईल असे पाटील म्हणाले. तसेच हे सरकार शेतकरी धार्जिणे नसून शेतकऱ्यांच्या प्रपंचावर नांगर फिरवणारे उदयोगपती धोरणी असल्याची घणाघाती टीका कैलास पाटील यांनी केली .
आमदार कैलास पाटील म्हणाले की भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या प्रपंचावर एक प्रकारे नांगर फिरवला. खते बी बियाण्यांचे भाव वाढवले, परंतु त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव वाढले का ? शेतकऱ्यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. या फसव्या सरकारने गुजरात वरून लाखो टन भेसळयुक्त दुधाची भुकटी महाराष्ट्रात आणली, यामुळे दुधाचे भाव ढासळले, भेसळयुक्त खवा दुध खते बियाणे हे गुजरातवरून महाराष्ट्रात येतात व जनतेच्या आरोग्याशी खेळत आपला पैसा गुजरातला ओरबडुन नेत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List