रोहित पवारांच्या कार्यकर्त्याच्या गाड्या पेटवल्या, भाजपवाल्यानो हीच का तुमची प्रचाराची पद्धत?
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एकीकडे प्रचाराचा तोडा धडाडत असून दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडाही होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्याच्या गाड्या पेटवून देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
रोहित पवार यांनी शुक्रवारी सकाळी एक्स अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. यात त्यांनी माझ्या कार्यकर्त्याच्या गाड्या मध्यरात्री पेटवून देण्यात आल्याचे म्हटले. हे कृत्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. भाजपवाल्यानो हीच का तुमची प्रचाराची पद्धत? असा सवालही रोहित पवार यांनी केला.
जामखेडमध्ये माझा कार्यकर्ता फिरोज बागवान यांच्या गाड्या मध्यरात्री पेटून देण्यात आल्या. स्टेजवरून आई-बहिणीवरून शिवीगाळ, घाणेरडे हावभाव, गाड्या पेटवून देणं, लोकांना धमकावणं हेच गुंडाराज असून भाजपला ते पुन्हा मतदारसंघात आणायचंय आणि भाजपवाल्यानो हीच का तुमची प्रचाराची पद्धत? पण लक्षात ठेवा मायबाप जनता 20 तारखेला तुमचे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
जामखेडमध्ये माझा कार्यकर्ता फिरोज बागवान यांच्या गाड्या मध्यरात्री पेटून देण्यात आल्या.. स्टेजवरून आई-बहिणीवरून शिवीगाळ, घाणेरडे हावभाव, गाड्या पेटवून देणं, लोकांना धमकावणं हेच गुंडाराज असून भाजपला ते पुन्हा मतदारसंघात आणायचंय… आणि भाजपवाल्यानो हीच का तुमची प्रचाराची पद्धत?
पण… pic.twitter.com/egAJx8FFOI
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 15, 2024
स्टेजवरून आई-बहिणीवरून शिवीगाळ, घाणेरडे हावभाव
दरम्यान, रोहित पवार यांनी आणखीही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात भाजपचे राम शिंदे, पाशा पटेल यांच्यासह भाजप नेते स्टेजवरून आई-बहिणीवरून शिवीगाळ, घाणेरडे हावभाव करत असल्याचे दिसते. शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही. यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय, असे रोहित पवार यांनी कॅप्शनमध्ये म्हटले.
शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग..
शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय, त्याचाच हा #ट्रेलर… pic.twitter.com/OJlROXxaT5— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 14, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List