महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर मोदी युगाचा अस्त होईल, शरद पवार यांचे भाकीत

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव निश्चित आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदी युगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी मोदी युगाच्या अस्ताचे भाकीत वर्तविले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी आज देशाचे सरकार चालवत आहेत, पण त्यांच्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मदत घेण्याची वेळ आली आहे. हे दोन्ही नेते एकेकाळी त्यांच्या राजकीय धोरणांवर टीका करत होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

बिहारमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली होती. त्यात नितीशकुमार यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती. भाजपविरोधात एक भक्कम पर्याय उभा करण्याची गरज आहे का यावर त्यांनी भाषण दिले होते. अशांना सोबत घेऊन मोदी आज नरेंद्र मोदी राजशकट हाकत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास देशातील मोदी युगाचा अस्त होत असल्याचा संदेश देशात जाईल, असे पवार म्हणाले.

z महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची परंपरा नव्हती, पण सध्या राज्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे त्यांनी मोठय़ा प्रमाणात पैशाचा वापर सुरू केला आहे हा चिंतेचा विषय आहे. लोकसभेला त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. लोकांनी मतदान आपल्या मतानुसारच केले. हा समजूतदारपणा येथील लोकांमध्ये आहे. त्यामुळे जनता महाविकास आघाडीला संधी देईल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

सत्ताधाऱ्याविरोधात मोठा अंडरकरंट

राज्यात महाविकास आघाडीत नेमक्या किती जागा जिंकणार हे आज सांगता येणार नाही; पण लोकसभा निवडणुकीत आम्हाला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आजही सत्ताधाऱ्यांविषयी लोकसभेसारखाच मोठ अंडरकरंट आहे. येथील जनतेला परिवर्तन हवे आहे, असे शरद पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. त्यांनी समाजात फूट पाडण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीला समाजात विद्वेष पसरवण्याची भाषा शोभत नाही. त्यांनी यापासून दूर राहिले पाहिजे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शारदाश्रमने उडवला स्वामी विवेकानंदचा धुव्वा शारदाश्रमने उडवला स्वामी विवेकानंदचा धुव्वा
आर्यन सकपाळच्या  101 चेंडूंतील 170 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर शारदाश्रम विद्यामंदिरने कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेचा 318 धावांनी धुव्वा उडवत...
धोनी, कोहलीमुळे माझ्या मुलाची 10 वर्षे वाया, संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप
ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात जिंकला
हिंदुस्थानने थायलंडला शिकवले हॉकीचे धडे, यजमान संघाची 13-0 फरकाने बाजी
आयुषच्या शतकाने मुंबईला सावरले
गोव्यात विश्वविक्रमांचे पर्व, अरुणाचल प्रदेशविरुद्ध गोव्याने रचला इतिहास; 8 धावांच्या सरासरीने 727 धावांचा पाऊस
दीड हजार दिलेत… 3 हजार वसूल करणार! भाजपाच्या महिला उपाध्यक्षाची लाडक्या बहिणींना दमबाजी