चांदीवाल आयोग अहवालात मी कुठेही दोषी नाही, अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण
निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपांची 11 महिने चौकशी केली. यात त्यांनी अनेकांचे जबाब नोंदविले. यावर 1400 पानांचा अहवाल तयार केला. या अहवालात मी कुठेही दोषी नसल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मागील दीड वर्षापासून हा अहवाल जनतेसमोर आणण्याची मागणी मी भाजपा सरकारकडे सातत्याने केली. पण त्यांनी जाणूनबुजून अहवाल जनतेसमोर येऊ दिला नाही. अहवाल जनतेसमोर येण्यासाठी मी न्यायालयातही धाव घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.
माझ्यावर जे आरोप लावले आहेत, त्याचे कोणतेही पुरावे चांदीवाल आयोगाच्या चौकशीत सापडले नाहीत. परमवीर सिंग यांना आयोगाने सहावेळा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते आले नाहीत. अटक वॉरंट काढल्यानंतर सिंग आले. त्यांनी आरोप केले होते, मात्र त्या आरोपासंबंधी माझ्याकडे कोणतेही पुरावे नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. सिंग यांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केले. सचिन वाझेने आयोगापुढे जबाब नोंदवला होता. त्यावेळी अनिल देशमुख यांनी मला कधीही बार मालकाकडून पैसे गोळा करण्यासाठी सांगितले नव्हते, असे वाझेने सांगितल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
n मुंबई उच्च न्यायालयात माझ्यावरील आरोपाची सात महिने केस चालली. उच्च न्यायालयाने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर निकाल दिला. त्यावेळीही न्यायालयाला माझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे आढळले नाहीत, असेही देशमुख म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List