पार्किंगदरम्यान शिक्षकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, पाच विद्यार्थ्यांना कारने चिरडले
पार्किंगदरम्यान शिक्षकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने शाळेच्या मैदानावर खेळत असलेल्या पाच विद्यार्थ्यांना चिरडले. उत्तर प्रदेशातील झाशी येथे गुरुवारी बालदिनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना मऊरानीपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
जगनपुरा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी बालदिनाच्या दिवशी शाळेच्या मैदानात खेळत होते. यावेळी शाळेतील एक शिक्षक कार पार्क करत होते. पार्किंगदरम्यान कार मागे घेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट पाच विद्यार्थ्यांच्या अंगावर गेली.
जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ मऊरानीपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List