ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात जिंकला

ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात जिंकला

पावसाच्या व्यत्ययामुळे टी-20 ऐवजी सेवन-7 षटकांच्या झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या 19 चेंडूंतील 43 धावांचा झंझावात जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 94 या धावांचा पाठलाग करणारा पाकिस्तान केवळ 9 बाद 64 धावाच करू शकला आणि वन डे मालिका गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली.

आजच्या सामन्यावर पूर्णपणे पावसाचे सावट होते आणि पावसाने दमदार सलामीही दिली. परिणामतः टी-20चा सलामीचा सामना विलंबाने सुरू झाला. हा सामना अवघ्या 7-7 षटकांचा खेळविला जाणार असल्यामुळे अपेक्षेप्रमाणे पहिल्या चेंडूपासूनच चौकार-षटकारांची बरसात सुरू झाली. गेल्या तिन्ही वन डेत 0, 16, 0 अशा खेळ्या करणारा मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आला आणि त्याने नसीम शाहला चार चौकार ठोकत आपल्या टी-20 क्रिकेटमधील 10 हजार धावांचा टप्पा गाठला. त्याने 3 षटकार आणि 5 चौकार ठोकत 43 धावा काढल्या. मग मार्कस स्टॉयनिसने 7 चेंडूंत 21 धावा काढत संघाची मजल 93 पर्यंत नेली. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या आघाडीवीरांची अक्षरशः तारांबळ उडाली. तेथेच पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला.  अवघ्या 3.2 षटकांत पाकिस्तानची 6 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर तळाच्या हसीबुल्लाह खान (12), अब्बास आफ्रिदी (ना. 20) आणि शाहिन आफ्रिदीने (11) फटकेबाजी केली. तरीही पाक 64 धावांपर्यंत पोहोचू शकला. ऑस्ट्रेलियाने एकतर्फी केलेला सामना 29 धावांनी जिंकला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मराठा-ओबीसी मतांची मोट बांधण्याचे का नाही कुणातच धाडस? निवडणुकीतून मुद्दा गायब, महायुती आणि महाविकास आघाडीची काय अडचण मराठा-ओबीसी मतांची मोट बांधण्याचे का नाही कुणातच धाडस? निवडणुकीतून मुद्दा गायब, महायुती आणि महाविकास आघाडीची काय अडचण
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण आणि त्याविरोधात ओबीसी आरक्षण बचाव या दोन्ही परस्परविरोधी आंदोलनाने समाजमन ढवळून निघाले. लोकसभा निवडणुकीत मराठा...
करीना कपूरचा ‘या’ सेलिब्रिटींसोबत ३६ चा आकडा, एकीला म्हणाली ‘काळी मांजर…’
सलमान खानने जेव्हा शाहरुख खानवर केला गोळीबार…, लोकांना वाटलं…
कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीत वाद उफाळला; मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी तडीपार
पार्किंगदरम्यान शिक्षकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, पाच विद्यार्थ्यांना कारने चिरडले
वार्तापत्र (महाड) – मशाल धगधगणार; परिवर्तन घडणार, स्नेहल जगताप यांना वाढता पाठिंबा
अयोध्या-लखनऊ महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन ठार तर 15 जण जखमी