माझ्या सदसद्विवेक बुद्धीला जे वाटले ते आबांबद्दल बोललो!
सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सही केल्याने आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकलो. आबांनी माझा केसाने गळा कापला, अशी टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता उपरती झाली आहे. जे झाले ते झाले, त्याबद्दल परत उकरून काढायचे नाही. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला जे वाटले ते मी बोललो. याचा निवडणुकीशी काही संबंध नाही. माझ्या दृष्टीने तो विषय संपल्याचेही पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी चिंचवडमधून बंडखोरी केलेले नाना काटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार पुढे म्हणाले, मावळमध्ये तिढा आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. फडणवीस, बावनकुळे हे मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराला येणार आहेत. महायुतीमधील कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. ऐकले नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List