‘रानटी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘रानटी’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड हे मराठी सिनेसृष्टीत ‘रानटी’ हा धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनित बालन स्टुडिओनिर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की, माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी काहीजणांना रानटी व्हावे लागते. या दशकातील सर्वात मोठा ‘अँग्री यंग मॅन’ दिग्दर्शक समित कक्कड 22 नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात. पुनित बालन म्हणाले, मराठीत अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता. मराठीत एक वेगळा प्रयत्न ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपुरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश करण्यासाठी विष्णू येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. याबरोबरच संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव, नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘रानटी’ चित्रपटासाठी ऋषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पाश्र्वसंगीत आहे. एझाज गुलाब यांची साहसदृश्ये आणि सेतू श्रीराम यांचं छायाचित्रण असून, आशीष म्हात्रे यांनी संकलन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने
Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड...
जोगेश्वरीत वायकरांकडून पैसे आणि भेटवस्तूचे वाटप, शिवसैनिक गद्दार मिंध्यांना भिडले
कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50 खोक्यांची ऑफर; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपाने खळबळ
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू! आदित्य ठाकरे यांचे मतदारांना आवाहन 
वार्तापत्र – वर्सोव्यात मशाल धगधगणार
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे ‘घटनाबाह्य’! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; भाजपशासित राज्यांना मोठा दणका
झारखंडमध्ये 65 टक्के मतदान, 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद