मुद्दा – अल्पसंख्याकांविषयी असूया म्हणजे हिंदुइझम नव्हे!

मुद्दा – अल्पसंख्याकांविषयी असूया म्हणजे हिंदुइझम नव्हे!

>> श्रीरंग बरगे

सध्या सोशल मीडियावर चालू असलेली टीकाटिपणी पाहिली तर सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार व त्यांचे अनुयायी अल्पसंख्याकांविषयी म्हणजेच खासकरून मुस्लिम समाजाविषयी सोशल मीडियावर द्वेष व आकस ठेवून  लिखाण करीत आहेत. असाच देश चालवणार असतील तर भारतातील लोकशाही जिवंत कशी राहील?  हिंदुइझम म्हणजे मुस्लिम समाजाचा कायम दुस्वास आणि बिगर मुस्लिम समाजाचा आदर, असा सोयीचा अर्थ लावला गेला आहे. देशाने स्वीकारलेल्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वाला हे तडा देणारे आहे.

सत्तेवर येणाऱ्या पक्षांची सरकारे म्हणजे केवळ व्यवस्था असते. त्यांना राज्यकारभार कसा करावा हे घटना शिकवते. म्हणून सर्व घटकांना एकत्र घेऊन कसे चालावे याचा पहिला धडा  म्हणजे घटना आहे. चुकलेल्याला दंडकही संविधान निश्चितपणे देते. देशाची घसरलेली राजकीय गाडी रुळांवर आणण्याचे काम सिक्रेट बॅलेट करते. सिक्रेट बॅलेटची जागा आज ईव्हीएम या नव्या तांत्रिक अस्त्राने घेतली आहे. देशाच्या नुकत्याच पार पडलेल्या 19 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत चुकलेल्या शासनावर ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेने दंडक उगारला आहे.

केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील 370 कलम हटविले. अर्थात त्यासाठी न्यायव्यवस्थेने हिरवा कंदील दाखवला होता. ही वस्तुस्थिती असली तरी ज्या उद्देशाने हे कलम रद्द करण्यात आले तो उद्देश सफल झाला का? जम्मू-कश्मीर राज्यातील 370 हे स्वायत्ततेचे कलम दूर करण्यात आले, ते  केवळ तेथील दहशतवाद निपटून काढला जावा यासाठी होय. सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय त्यासाठीच दिला होता, परंतु जम्मू-कश्मीरमधील निरपराध्यांवर होणारे हल्ले कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. केंद्र सरकार मात्र म्हणत आहे, हे कलम संपविण्यासाठी प्रथम आम्हीच धाडस दाखवले आणि दहशतवादी कारवायाही हद्दपार आम्हीच करू शकलो. याला वल्गनाच म्हणावे नाही तर काय? जम्मू-कश्मीरमधील गंदरमल जिल्ह्यात बोगद्याचे बांधकाम करणाऱ्या मजुरांवर हल्ली काही दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याला जबाबदार कोण आहे? या हल्ल्याची जबाबदारी एका अतिरेकी संघटनेने घेतली असेल, परंतु सरकार हा दहशतवादी हल्ला थोपविण्यात असमर्थ ठरले नाही का?

स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणत असत, त्याप्रमाणे हिंदू धर्म हा मानवता या एकाच सूत्रावर आधारलेला आहे. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने मांडलेल्या गीतेमध्येदेखील तेच तत्त्व मांडण्यात आले आहे आणि भारतीय संविधानाचेही सूत्र तेच आहे.

बिगर हिंदूचा दुस्वास आणि हिंदूंना कवटाळणे म्हणजे खरे हिंदुत्व असेल तर मग महाराष्ट्रात भाजपचे हिंदुत्व कुठले म्हणायचे? अल्पसंख्याकांचा सातत्याने दुस्वास करीत बसण्याला अलीकडे हिंदुत्व म्हणण्याची नवी पद्धत जन्माला आली आहे, असे वाटते, पण देशाला स्वातंत्र्य मिळविताना असंख्य हिंदू स्वातंत्र्य सैनिकांबरोबर उदाहरण द्यायचे झाल्यास मौलाना आझादांसारख्या अनेक मुस्लिम स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण पणाला लावले होते. याला काहीच अर्थ नाही काय? देशाला स्वातंत्र्य मिळविताना भारतीय जनता जनता पक्ष कुठे होता? असा प्रश्न केला तर याचे उत्तर त्या पक्षाकडे आहे काय? जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तान अतिरेक्यांकडून  नागरिकांना कंठस्नान घालत आहे, पण कोणीच काही बोलत नाही. सत्ताधाऱ्यांकडून आज मुस्लिम समाज दुर्लक्षिला जात आहे. मात्र तो समाज आज इंडिया आघाडीमागे ठाम उभा आहे.

सध्याच्या स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपली अल्पसंख्याक समाजाबद्दलची भूमिका बदलून सर्व जातीधर्मांना एकत्र ठेवणारे त्याचप्रमाणे घटना व संविधान मानणारे खरे हिंदुत्व अंगीकारले तरच त्यांना खरे हिंदुत्ववादी म्हणता येईल व त्यालाच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतील खरे हिंदुत्व म्हणता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले...
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली