दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी यवतमाळमधील वणी येथे विराट सभा पार पडली. या सभेआधी निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर जिथे उतरले त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधील त्यांच्या बॅगा तपासल्या. या घटनेचा व्हिडीओ स्वत: उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड केला असून त्यावरून सध्या सत्ताधारी व निवडणूक अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी व निवडणूक आयोगाला फटकारले आहे.
”उद्धवसाहेबांच्या सामानाची आज वणी इथे तपासणी करण्यात आली. जे कायद्याला धरुन ते झालंच पाहिजे पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिलाय, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा. कायदा सगळ्यांना समान हवा. महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे ‘दूध का दूध और पानी का पानी!”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List