प्रेयसीला अमेरिकेला पाठवले, संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर झाडली गोळी

प्रेयसीला अमेरिकेला पाठवले, संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर झाडली गोळी

हैदराबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. प्रेयसीला घरच्यांनी विदेशात पाठवल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्या वडिलांवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. तरुणासोबतचे प्रेमसंबंध संपवण्यासाठी तरुणीच्या वडिलांनी तिला अमेरिकेला पाठवले. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने तिच्या घरी पोहोचला आणि त्याने गोंधळ घातला. त्यानंतर त्याच्यात आणि प्रेयसीच्या वडिलांमध्ये झालेल्या बाचाबाचीत त्याने गोळी झाडली.

ही घटना हैदराबादमध्ये झाली असून रेवंत आनंद यांच्या डोळ्यात गोळी लागली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. 25 वर्षीय बलविंदर आणि व्यावसायिक आनंद यांची 23 वर्षीय मुलगी यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत तिच्या वडिलांना समजले. तेव्हा त्यांनी तिच्या या नात्याला विरोध केला. तिला त्याच्याशी नाते संपवायला सांगितले मात्र ती काही ऐकली नाही. दोघेही एकमेकांना भेटत राहिले. ते नियमित फोनवर बोलायचे. अखेर तिच्या वडीलांनी तिला अमेरिकेला पाठविण्याचा निर्णय घेतला आणि तिला अमेरिकेला पाठवले. हे कळल्यावर बलविंदर हादरला आणि त्याने प्रेयसीच्या घरी जाऊन गोंधळ घातला. त्यावरुन झालेल्या बाचाबाचीत तरुणाने प्रेयसीच्या वडीलामवर गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या आनंद यांना पोलिसांनी रुग्णालयात पोहोचवले. घटनास्थळावरुन फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल टॉक्सिक लोकांपासून दूर, नो अल्कोहोल; ब्रेकअपवरील भाष्यानंतर मलायकाची नवीन पोस्ट व्हायरल
अभिनेत्री मलायका सध्या अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे फार चर्चेत आहे. तसेच या परिस्थितीतून ती सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने कित्येकदा सांगितले...
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी बायडन यांची घेतली भेट, सत्ता सोपवण्याबाबत झाली चर्चा
Video : आता गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवार यांचा वळसे-पाटलांना इशारा
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
काळ्या कपड्या आड Team India चा गुप्त सराव, गौतम गंभीर यांचा नवा डाव; ऑस्ट्रेलियाचं पानिपत निश्चित?
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
गद्दार संतोष बांगर यांच्या गुंडांची गुंडगिरी; पैसे वाटपापासून रोखले म्हणून शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडली