Chandrapur news – पार्टी जीवावर बेतली; माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टी एका माजी उपसरपंचाच्या जीवावर बेतली आहे. विहिरीत पडून माजी उपसरपंचाचा मृत्यू झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजानन काळे असे माजी उपसरपंचाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यात पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे देखील सहभागी झाले होते. पार्टी सुरू असताना गजानन काळे हे सहकाऱ्यासोबत बाजुला गेले, मात्र अंधाराचा अंदाज न आल्याने दोघेही बाजुच्या विहिरीत कोसळले.
विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आणि त्यापाठोपाठ दोघांच्या किंकाळ्यामुळे पार्टीला उपस्थित कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेतली. एक जण पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने विहिरीत उडी घेतली आणि एकाला वाचवले. मात्र यादरम्यान गजानन काळे बुडाले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली आणि विहिरीन मृतदेह बाहेर काढला. विहिरीत पडलेला व्यक्ती नशेत होता का? त्यांना कुणी धक्का दिला का? हा अपघात आहे की घातपात? अशा शंका आता उपस्थित केल्या जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List