बिष्णोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

बिष्णोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलीवूडचा दबंग सलमान खान याला बिष्णोई गॅंगकडून सातत्याने जीवे मारण्याची धमक्या येत आहेत. त्यामुळे आता त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. सलमान खानवर काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. काळवीट हे बिष्णोई समाजात पूजनीय आहेत. त्यामुळे बिष्णोई गँग सलमानला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मात्र, सध्या सलमानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात काळविटाची शिकार केली नसल्याचे सलमानने म्हटले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सलमान खानचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ही एक मोठी कहाणी आहे. मी काळविटाची शिकार केली नाही’, असे तो म्हणाला. यानंतर त्या प्रश्ना विचारला गेला की, तो इतर कोणाचंही नाव का घेत नाही आणि त्याला गप्प राहणं योग्य का वाटतं? या प्रश्नावर सलमान म्हणाला की, “यात काही अर्थ नाही. मी कधीच कोणाबद्दल काही बोललो नाही. मला याची गरज नाही आणि मी ते करणार नाही.”

काळवीट शिकार प्रकरण हे फार जुने आहे. सन 1998 मध्ये एका चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सलमानने काळविटाची शिकार केल्याचा आरोप आहे. गेल्या 26 वर्षांपासून हे प्रकरण देशभरात गाजतय. त्यामुळे काळविटाची पूजा करणारा बिष्णोई समाजाने सलमानवर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत सलमानच्या समर्थनार्थ भाष्य केलं होतं. तो एक झुरळही मारू शकत नाही, तर काळविटाची शिकार कशी करेल”, असे ते म्हणाले.

I wasn’t the one who shot the blackbuck says Salman (2008)
byu/Icy-One-5297 inBollyBlindsNGossip

सलमान खानचा हा व्हिडीओ 2008 सालचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस महिलांना महिन्याला 3000, बेरोजगारांना 4000, 25 लाखांचा विमा, शेतकऱ्यांना 3 लाखांची कर्जमाफी, महाविकास आघाडीकडून आश्वासनांचं पाऊस
महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी...
अकाली म्हातारे व्हाल… फक्त ऑफिसमधील ही गोष्ट टाळा
जनताच आता राज्यात कायद्याचे राज्य निर्माण करत कौरवी वृत्तींचा नायनाट करेल; रोहित पवार यांचा विश्वास
दिल्लीच्या NSG कॅम्पमध्ये आढळला जवानाचा मृतदेह
ते आता आमच्यापासून फार लांब गेलेत, आमच्याकडील सर्व जागा भरल्या आहेत; अजित पवार गटाबाबत जयंत पाटलांचे उत्तर
शरद पवारांबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली
यंदाची लग्नसराईत दणक्यात; सराफा बाजारासह इतर व्यवसायांना उभारी मिळणार