बाईक स्टंटचा रील्स बनवणे महागात पडले, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा रस्ते अपघातात मृत्यू
सोशल मीडियावर बाईक स्टंटचा रील्स बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहेत. स्टंटबाजी करताना रस्ते अपघातात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे. भागचंद बैरागी असे मयत तरुणाचे नाव आहे.
दाखिया गावात राहणारा भागचंद सोशल मीडियावर बाईक स्टंटचा रील्स बनवायचा. त्याचे सोशल मीडियावर 5 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. एनएच -52 वर बाईकवर विना हेलमेट स्टंट करताना व्हिडिओ बनवत असतानाच भागचंदचा अपघात झाला.
रील्सच्या नादात त्याची बाईक स्वीपर मशिनला मागून धडकली. या अपघातात बाईकचा चक्काचूर झाला. गंभीर जखमी भागचंदला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List