Mahindra च्या ‘या’ कारवर मिळत आहे 3.50 लाख रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
महिंद्रा थार 4×4 ही भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्हीपैकी एक आहे. ही कार पहिल्यांदा 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 3 डोअर थारच्या यशानंतर कंपनीने या वर्षी ऑगस्टमध्ये महिंद्राने थार रॉक्स 5 डोअर बाजारात लॉन्च केली आहे. Thar Roxx ची डिझाइन फॅमिलीला डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे, असं बोललं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, थारच्या स्पेशल अर्थ एडिशन मॉडेलवर सध्या 3.50 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही सूट डीलरशिपकडून दिली जात आहे.
महिंद्राने काही काळापूर्वी ग्राहकांसाठी थारचा अर्थ एडिशन बाजारात आणला होता. मात्र ही कार ग्राहकांना फारशी आकर्षित करू शकली नाही. त्यामुळे डीलरशिपवर जुना स्टॉक पडून आहे, ज्याला ग्राहकांची कमी पसंती मिळत आहे. अशातच कंपनी या कारवर 3.50 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. यातच थार स्पेशल अर्थ एडिशनची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया…
दोन इंजिन पर्याय
थार अर्थ एडिशनमध्येही तेच इंजिन देण्यात आले आहेत जे याच्या रेग्युलर मॉडेलमध्ये पाहायला मिळते. या मॉडेलमध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 2.2-लिटर डिझेल इंजिनचा पर्याय आहे. जो 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
किती आहे किंमत?
कंपनी थार अर्थ एडिशनसह ग्राहकांना ॲक्सेसरीजही देत आहे, ज्या ते त्यांच्या गरजेनुसार खरेदी आणि वापरू शकतात. थार अर्थ एडिशन पेट्रोल मॅन्युअलची किंमत 15.40 लाख रुपयांपासून सुरू होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List