कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नाराज नेते मुख्तार शेख यांनी उमेदवारी घेतली मागे, रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा
काँग्रेसमधून नाराज झालेले मुख्तार शेख यांनी कसबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेख यांची नाराजी दूर झाली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शेख म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि खासदार सईद नासीर हुसेन यांनी मला संपर्क केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी मला आश्वासन दिले आहे. म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. यापुढे रवींद्र धंगेकर यांच्यासाठी आपण प्रचार करणार
असेही शेख म्हणाले.
#MaharashtraElection2024 | Rebel Congress leader from Kasba Assembly constituency Mukhtar Shaikh who had filed nomination as Independent candidate decided to withdraw his nomination and support official MVA candidate Ravindra Dhangekar.
Mukhtar Shaikh says, “I have decided to… pic.twitter.com/PDjer6OT6d
— ANI (@ANI) November 4, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List