मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

मिंधे-भाजप सरकारच्या काळात मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचे मोठमोठे अनेक घोटाळे समोर आल्यामुळे करदात्या जनतेमधून प्रचंड संताप व्यक्त होत असताना आता खुद्द मिंधेंच्या नगर विकास खात्यातच तब्बल 74.41 कोटींचा ‘रंगरंगोटी’ घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. शेतकऱ्यावर अस्मानी संकटामुळे उपासमारीची वेळ आली असताना त्यांना मदत देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीत. मात्र केवळ दिखाव्यासाठी मेट्रोच्या अर्धवट कामांची रंगरंगोटी करण्यासाठी चढय़ा दराने निविदा काढण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, असा जबरदस्त टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात झालेला घोटाळा आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उघड केला. मुंबई आणि परिसरात मेट्रोची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झालेली नसताना पिलर्स रंगवले जात आहेत. यासाठी चढय़ा दराने निविदा काढून तब्बल 74.41 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र सरकारने लक्षात ठेवावे, 23 तारीखला महाविकास आघाडीचे सरकार बनत आहे. या वेळी सगळ्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल आणि यामध्ये जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. सरकारकडे सामान्यांसाठी, शेतकऱयांसाठी पैसे नाहीत. मग हे पैसे कंत्राटदाराच्या खिशात जातात तरी कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

असा झाला घोटाळा

आदित्य ठाकरे यांनी 26/12/2022 रोजीची ‘एमएमआरडीए’ची दोन पत्रेच या वेळी दाखवली. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंगकाम केले जात आहे. मेट्रो – 2 अ आणि मेट्रो – 7 च्या रंगरंगोटीसाठी एमएमआरडीएने एक पत्र दिले आहे. त्यानंतर 4 ऑक्टोबरला चढय़ा दराने निविदा काढण्यात आली.

ज्यामध्ये मेट्रो पोल आणि इतर भागांची रंगरंगोटी करण्यात येईल, असे म्हटले आहे. यानुसार 74.41 कोटी रुपये काम होण्याआधीच रंगरंगोटीसाठी खर्च केले जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करणार. पुन्हा खर्च होणार. हा मोठा घोटाळा असल्याचे आदित्य ठाकरे या वेळी  म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर...
मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात
वार्तापत्र – फातर्पेकर राखणार चेंबूरचा गड
मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
लेख – बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी…!