महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात

महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात

आज राज्यातील प्रत्येक गोष्ट गुजरातला चालली आहे. महाराष्ट्रातील नोकऱ्या, रोजगार हे गुजरातला घेऊन जात आहेत. उद्या चाकणमधील उद्योगही गुजरातला घेऊन जातील, अशी भीती व्यक्त करीत महाराष्ट्र आणि मराठी माणसाला भिकारी बनविण्याचे काम महायुतीकडून चाललेय,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार संजय राऊत यांनी भाजप व मिंधे गटाचा समाचार घेतला. ‘खेड, आळंदी आणि चाकण भागाच्या विकासासाठी शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांना विजयी करून इथल्या गद्दार आमदाराला कायमचे घरी बसवा,’ असे आवाहनही संजय राऊत यांनी जनतेला केले.

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारासाठी चाकण येथील बाजार समितीच्या आवारात भव्य सांगता सभा पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते. याप्रसंगी महाविकास आघाडीचे खेड-आळंदी मतदारसंघाचे उमेदवार बाबाजी काळे, जुन्नर मतदारसंघाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संजय राऊत म्हणाले, इथली चाकण एमआयडीसी ही शरद पवार यांची कृपा आहे. औद्योगिक विकास कसा करावा हे मिंधे, फडणवीस यांना जमणार नाही. जगातल्या ऑटोमोबाईल पंपन्या या भागात आणणे सोपे काम नसल्याचे त्यांनी नमूद करून, इथला गद्दार आमदार एक नंबर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची टीका करीत, ‘आपल्या सहकाऱयाचा खून करणारा, इंडस्ट्रीमधून खंडण्या गोळा करणारा माणूस इतके दिवस आमदार कसा राहू शकतो?’ असा सवाल संजय राऊत यांनी स्थानिक आमदाराचे नाव न घेता उपस्थित केला.

‘शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी बाबाजी काळे यांना आपण विजयी केले पाहिजे. मला आज सुरेश गोरे यांची आठवण येते. ते आमदार झाले. त्यांच्या वाटय़ाला संघर्ष आला तो या सध्याच्या दळभद्री आमदारामुळे,’ अशी टीका त्यांनी स्थानिक आमदारावर केली. इथले माजी खासदार तिकडे पळून गेले. त्यांची आज काय अवस्था झाली ते आपण पाहिले. मात्र, या परिस्थितीमध्येही इथल्या सैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना टिकवून ठेवल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

फडणवीसांच्या मेंदूचे कौतुक करावेसे वाटते!

‘राज्यातील सरकार, एकही मंत्री विकासावर बोलत नाही. तुम्ही विकासावर बोला,’ अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मिंधे यांच्यावर निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या मेंदूचे तर कौतुक करावेसे वाटते. त्यांचा मेंदू भविष्यात म्युझियममध्ये ठेवला पाहिजे,’ अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

महाराष्ट्र, मराठी माणूस एक असून, सेफ आहे!

‘यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगवी लुंगी घालून इकडे येतात, ‘बटेंगे तो कटेंगे’च्या घोषणा देतात. तुम्ही महाराष्ट्राला, मराठी माणसाला मूर्ख समजता का?’ असा सवाल करीत, ‘आम्ही सगळे एक आहोत, महाराष्ट्र एक आहे, मराठी माणूस एक असून, आम्ही सेफ आहोत,’ असे संजय राऊत यांनी ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर...
मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात
वार्तापत्र – फातर्पेकर राखणार चेंबूरचा गड
मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
लेख – बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी…!