अक्षय शिंदे एन्काऊंटर; सीआयडीच्या तपासात दोष
बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर तपासात अनेक दोष असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सीआयडीवर ठेवला.
या एन्काऊंटरचा न्यायालयीन चौकशीचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर होणे अपेक्षित होते. मात्र हा अहवाल सादर झाला नाही. हा चौकशी अहवाल सादर करण्यासाठी अजून चार आठवडय़ांची मुदत द्यावी. कारण सीआयडीने तपासाची कागदपत्रेची दिलेली नाहीत, असे महानगर दंडाधिकारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर न्यायालय संतप्त झाले. तुम्ही हा तपास गांभीर्याने घेत नाही आहात. तपासात अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सीआयडीला फटकारले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List