महाराष्ट्र धर्माचे शत्रू मोदी-शहा आणि त्यांचे बुट चाटणारे शिंदे-फडणवीस, संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्र धर्माचे शत्रू मोदी-शहा आणि त्यांचे बुट चाटणारे शिंदे-फडणवीस, संजय राऊत यांचा घणाघात

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, त्यासाठी मिंधे सरकार आणि फडणवीस जबाबदार असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच मोदी-शहा आणि त्यांचे बुट चाटणारे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र धर्माचे शत्रू आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर नागपुरात हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा हल्ला करताना भाजप झिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांना ठार मारण्याच्या हेतूने हल्ला होतो. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत आणि त्यासाठी मिंधे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सर्व सुत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात. तरीही भाजपच्या काळात गृहमंत्र्यांचा हुकुम चालतो. निवडणूक आयोग हा त्यांच्यात हातात असतो, त्यांचीच माणसं असतात, त्यांचीच माणसं हातात हात धरून काम करतात. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर अला निर्घृण हल्ला झाला कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे, उद्या राज्यात मतदान होणार आहे त्यामुळे आम्हाला चिंता आहे की विरोधी पक्षाच्या किती नेत्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील, किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील या विषयी आम्हाला चिंता वाटते. कारण हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा केली. महाराष्ट्राला धक्का बसावा चिंता वाटावी असा हा कालचा प्रकार आहे असे संजय राऊत म्हणाले.

भाजपवाले म्हणतात हा स्टंट आहे, नरेंद्र मोदींकडून आम्ही स्टंट करायला नाही शिकलो. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकायची गरज नाही, हे स्टंट जे आहेत तुमचे पंतप्रधान, तुमचे नेते कायम करत असतात. देशमुखांचं डोक किती फुटलं ते बघा. देशमुखांचे चिंरजीव काटोलमधून उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत. सातवेळा देशमुख निवडन आलेत. मला तो मतदारसंघ माहित आहे. भाजपची ही नौटंकी सुरू आहे. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हतं. माजी मंत्री, माजी गृहमंत्री यांच्यावर हल्ला झाला. असे वातावरण कोणत्याही निवडणुकीत झालं नव्हतं. हे वातावरण देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या काळात झाले आहे. तिकडे मणिपूर पेटलंय, महिलांना रस्त्यावर आणून त्यांची धिंड काढली जाते आणि त्यांच्यावर बलात्कार होता आहेत. इथे मंत्र्यांवर हल्ले होत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना आमदारकी मिळाली आणि मंत्रिपदं मिळत गेली, हे राज ठाकरेंना बहुतेक माहित नसावं.

धर्मयुद्ध या शब्दावर आम्ही कधीच आक्षेप घेतला नाही. आमचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे आणि या महाराष्ट्र धर्माचे शत्रू कोण आहेत. तर गुजरातचे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे बुट चाटणारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राला, मराठी माणसाला भिकेला लावण्याचे काम या महाराष्ट्राच्या शत्रूंनी केले आहे. म्हणून महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही हे धर्मयुद्ध पुकारलेले आहे. फडणवीसांनी आधी मनापासून जय महाराष्ट्र म्हणावं, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी आपली भुमिका होती, आजही आपल्या मनात तेच पाप आहे.

आमच्या बॅगा तपासल्या जातात तेव्हा आम्ही बोंबाबोंब केली तेव्हा अमित शहा , देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टर तपासले जातात. हे स्टंट आहेत. हेलिकॉप्टरमधून पैसे नाही दिले जात, पोलीसांच्या गाडीतून कंटेनरमधून, 20-25 कोटी रुपये आधीच पोहोचले आहेत. ही स्टंटबाजी बंद करावी, या राज्यातील जनता मुर्ख आहे का?

एका पंचंतारांकित हॉटेलमध्ये पैसे सापडले आहेत. हे जप्त करण्यासाठीच ठेवलेले असतात. सांगोल्यात शाहजी बापू यांचे 22 कोटी सापडले असे सांगतात आणि पाच कोटी पकडले. म्हणजे कारवाईचा हा स्टंट आहे. काल माझी बॅग तपासली 17 रुपये सापडले असेही राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय? मुंबई ते नवी मुंबई विमानतळ 17 मिनिटांत गाठता येणार, नितीन गडकरी यांचा नवीन प्रोजेक्ट काय?
Mumbai’s transportation network: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी देशातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणत आहे. काळानुसार...
दिल्लीत श्वास कोंडला, मुंबईची हवा बिघडली, AQI किती?
Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार
शिल्पा शेट्टीने स्वतःचा संसार थाटला आणि माझा मोडला…, सवतीचं शिल्पा शेट्टीला पत्र
सुष्मिता सेनची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा निर्णय
Kantara 2 Teaser: हातात त्रिशूळ, रक्ताने माखलेलं शरीर.. ‘कांतारा 2’चा टीझर पाहून अंगावर येईल काटा!
‘पुष्पा 2’च्या ट्रेलरमध्ये दिसलेला भयानक पुरुष कोण? श्रीवल्लीच्या हत्येशी कनेक्शन?