Delhi Pollution – वाढत्या प्रदूषणामुळे दहावी-बारावीचे वर्गही बंद; दिल्ली सरकारची घोषणा

Delhi Pollution – वाढत्या प्रदूषणामुळे दहावी-बारावीचे वर्गही बंद; दिल्ली सरकारची घोषणा

देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर हिंदुस्थानातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे वायू प्रदुषण मोठ्या प्रमाणातक वाढल्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आता शाळांसोबतच 10वी आणि 12वीचे वर्ग देखील बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ”10वी आणि 12वीचे वर्ग बंद करण्यात येत असून सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावेत”, असे त्यांनी पोस्ट केले आहे.

दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यासाठी दिल्ली सरकारने ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा फेज-4 लागू केला आहे. याअंतर्गत दिल्ली सरकार प्रदूषणाच्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजनांचा अवलंब करत असून दिल्ली सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील हवेत बरेच बदल झाले आहेत. आजुबाजुच्या राज्यांमध्ये चारा जाळण्याचे प्रमाण वाढत असून त्याचा परिणाम दिल्लीतील हवेवर होत आहे. हवामान विभागाने केलेल्या चाचणीत सोमवारी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता अधिक ढासळ्याचे आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

छत्रपती संभाजीनगरात बोटांना शाई लावून पैसे वाटप, मतदान टाळण्यासाठी ‘मिंध्यांची’ हेराफेरी; अंबादास दानवेंनी केला भंडाफोड छत्रपती संभाजीनगरात बोटांना शाई लावून पैसे वाटप, मतदान टाळण्यासाठी ‘मिंध्यांची’ हेराफेरी; अंबादास दानवेंनी केला भंडाफोड
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिंध्यांकडून मतदान टाळण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करून त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येत असल्याचा...
अनिल देशमुखांवर समाजकंटकांचा भ्याड हल्ला, चौकशी करून मास्टरमाईंडला गजाआड करा; सुप्रिया सुळेंचा संताप
Delhi Pollution – वाढत्या प्रदूषणामुळे दहावी-बारावीचे वर्गही बंद; दिल्ली सरकारची घोषणा
मतांसाठी महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर कारवाई होणार का? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
चित्रपट येण्याआधीच ‘पुष्पा 2’च्या ट्रेलरने सर्व रेकॉर्ड मोडले; आता 1000 कोटींचा टप्पा पार करणार?
पुष्पापासून केजीएफ आणि बाहुबलीपर्यंत, या सिनेमाच्या यशात रविना टंडनच्या पतीचा हात
रोज एक अंड खाल्ल्याचा आहे चत्मकारीक फायदा, संशोधनातून समोर आली मोठी गोष्ट