माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर भ्याड हल्ला; दगडफेकीत गंभीर जखमी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर भ्याड हल्ला; दगडफेकीत गंभीर जखमी

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काटोलमध्ये हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या कारवर दगडेफेक करण्यात आली. त्यात देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असण्याची शक्यता देशमुख यांनी व्यक्त केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत.

काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे पुत्र सलील हे राष्ट्रवादीकडून लढत आहेत. नरखेड येथे आज अनिल देशमुख यांनी सांगता सभा घेतली. ती सभा आटोपून देशमुख काटोलकडे परतत असताना काटोल-जलालखेडा मार्गावरील बेलफाटय़ाजवळ त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. यात कारची समोरची काच फुटली असून डोक्याला दगड लागल्याने देशमुख यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली आहे. डोक्याला पट्टी बांधूनही रक्त थांबत नसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या दगडफेकीत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्रथमोपचार घेतल्यानंतर त्यांना नागपूरच्या अॅल्सीस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हल्ल्यामागे भाजपचा हात

मतदानाला 48 तास उरले असताना राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी जखमी अवस्थेत प्रतिक्रिया दिली असून या भ्याड हल्लामागे भाजपचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

फडणवीस यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? – संजय राऊत

गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे. मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. शेम… शेम… असा संताप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अन्यथा संघर्ष – शरद पवार

राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिला. राज्याचे गृहमंत्री आणि आमचे सहकारी यांच्यात वादावादी होत होती. त्यात देशमुख यांच्या मुलाला मतदारांचा मिळणारा प्रतिसाद काही प्रवृत्तींना सहन झाला नाही. फडणवीस यांच्या विचारांच्या लोकांनी हा हल्ला केल्याचे कळतेय. व्यक्तिगत हल्ले करण्यापर्यंत यांची मजल गेली हे गंभीर आहे, असे पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद आदित्य ठाकरे यांचा प्रचाराचा धडाका! वरळी, माहीम, वांद्रे येथे रोड शोला तुफान प्रतिसाद
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम मतदारसंघात रोड शो, तर...
मिंधेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा कसला; आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप
महायुतीमुळे मराठी माणूस भिकेला लागला! चाकणमध्ये प्रचंड सभेत संजय राऊत यांचा घणाघात
वार्तापत्र – फातर्पेकर राखणार चेंबूरचा गड
मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
लेख – बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी…!