शिंदेंना ऐन निवडणुकीआधी बहिणी आठवल्या, महादेव जानकर यांचा मिंधे-भाजपवर हल्ला

शिंदेंना ऐन निवडणुकीआधी बहिणी आठवल्या, महादेव जानकर यांचा मिंधे-भाजपवर हल्ला

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना अचानक राज्यातील लाडक्या बहिणींची कशी काय आठवण झाली? सरकार म्हणून पाच वर्षे कुठे होतात? फोडाफोडीसाठी गुवाहाटीला गेला होतात का? अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मिंधे आणि भाजपवर हल्ला चढवला. धाराशीव येथे प्रचार सभेत ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी ही चालू पार्टी आहे. ते कुठल्या माणसात माणूस ठेवत नाहीत. पवार साहेबांनी पक्ष काढला. त्यांच्या घरात भाजपवाल्यांनी फोडाफोडी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष काढला. त्या शिवसेनेलाही यांनी फोडले, असे जानकर यावेळी म्हणाले. भाजपपासून सावध राहा. जे म्हणतात ना तुम्हाला पाणी दिलं, लाईट दिली, विमा दिला, परंतु ते काय यांच्या खिशातून दिले का? हे पैसे तुमचेच आहेत. तुमच्याच टॅक्समधून हे पैसे कापले जातात, असेही महादेव जानकर यावेळी म्हणाले. मी काय मुख्यमंत्री होणार नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्येही नाही. मी आयुष्यात कधी मुख्यमंत्री होणार नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन मशालीने बेबंदशाही भस्म करून टाका! उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्रप्रेमींना कळकळीचे आवाहन
शिवसेनेची निशाणी कोणती? मशाल… बाळासाहेबांची मशाल… शिवसेनाप्रमुखांची मशाल… हिंदुहृदयसम्राटांची मशाल. मी बाळासाहेबांची मशाल आहे, महाराष्ट्रातील बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून...
तलवारी म्यान झाल्या! आज रात्र मतदाराची, विनवण्या आणि आळवण्यांची
लेख – बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी…!
प्रासंगिक – सीमेवरचा ‘तो’ झंझावाती दौरा
मुंबईत 2 लाख 87 हजार मतदार वाढले; एक लाख कर्मचारी ऑन इलेक्शन डय़ुटी
सामना अग्रलेख – महाराष्ट्र धर्माची लढाई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर भ्याड हल्ला; दगडफेकीत गंभीर जखमी