महाविकास आघाडीला प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचा पाठिंबा; घटनाविरोधी सरकारला सत्तेवरून उतरवणार

महाविकास आघाडीला प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचा पाठिंबा; घटनाविरोधी सरकारला सत्तेवरून उतरवणार

 भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास दलित, मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्याक समाजाचे प्रचंड नुकसान होणार आहे. भाजपचे सरकार घटनाविरोधी आहे. त्यामुळे प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रमुख सन्मवयक श्यामदादा गायकवाड यांनी आज दिली.

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय येथे आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते सुभाष देसाई, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, सुनील खोब्रागडे,  केशव वाघमारे, निवृत्त पोलीस अधिकार संजय अपरांती उपस्थित होते.

आम्ही उमेदवार उभे केले नाहीत, पण दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत प्रश्नावर आम्ही पाठिंबा दिला आहे.  आमच्या मूलभूत प्रश्नावर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी आमच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, असेही श्यामदादा गायकवाड यांनी सांगितले.

या वेळी बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले की, प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने राज्यात जातीनिहाय जनगणना करावी, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा 75 टक्क्यांवर न्यावी यासाठी दबाव वाढवण्याची मागणी केली आहे. अशा मागण्यांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. महाविकास आघाडीचा वचननामा काही दिवसांत प्रसिद्ध होईल. त्यामध्ये शिष्यवृत्त्या, झोपडपट्टीची दुरवस्था या सर्वांकडे लक्ष दिले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ  नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे. जागा वाटपात या गटांना सामावून घेता आले नाही तरी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व सामाजिक संघटना, रिपब्लिकन गटांना मानसन्मानाची वागणूक मिळेल. अनेक संधी येतील त्याद्वारे आपल्याला देशाची सेवा करता येईल, असा विश्वास या वेळी सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. वर्षा गायकवाड यांनीही प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे स्वागत केले आणि महाराष्ट्रात सत्ताबदल होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात दलित आदिवासी यांच्या शिक्षणासाठी या सरकारने कात्री लावली आहे. अजित पवार अर्थ मंत्री झाले की दलितांचा निधी वळवला जातो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. या वेळी माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर यांचेही भाषण झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप, संभाजीनगर, नालासोपारात तुफान राडा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा आरोप सुरु झाला आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना...
नेत्यांच्या भाषणांमधील नको ते शब्द, हातवारे यांचा अर्थ मुलं विचारतात…, प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेत
“विवाहित पुरुषाला डेट करण्याचा पश्चात्ताप..”; विक्रम भट्टसोबतच्या अफेअरवर सुष्मिता काय म्हणाली?
रिया सेनच्या वडिलांचं निधन; ॲम्ब्युलन्स घरापर्यंत पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा आवळ्याचा मुरब्बा, जाणून घ्या रेसिपी
पोळी की भात? जाणून घ्या रात्रीच्या जेवणासाठी काय खाणे फायदेशीर
भाजपचा खेळ खल्लास! विनोद तावडेंच्या पैसे वाटपावरून संजय राऊत यांचा निशाणा