मनोज जरांगे यांच्या निर्णयाने आनंद; शरद पवार यांची प्रतिक्रिया
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. या मुद्द्याचा भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता. तसेच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, या निवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही, असे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवार देण्याबाबत मित्र पक्षांची यादी आली नसल्याने आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयावर शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मला आनंद आहे. आनंदीत होण्याचे कारण आहे की, जरांगे सतत सांगत आहेत की भाजप हाच आमचा विरोधक आहे. उमेदवार दिले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असेही शरद पवार म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांनी 13 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा रविवारी केली होती. मात्र, त्यानंतर सोमवारी मनोज जरांगे पाटील यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. राज्यात निवडणुकीसाठी ज्या मराठा बांधवांनी अर्ज दाखल केलेत, त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच आता लढणार नसून पाडणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आता पाडापाडी करावी लागणार आहे. आपण गेल वर्षभर राजकारण पाहतोय. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. आपण कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा, असे देखील म्हणत नाही. माझे आंदोलन सुरू राहणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
रश्मी शुक्लांबाबत घेतलेला निर्णय योग्य, निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या थोबाडीत दिली! – शरद पवार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List