मरीन ड्राईव्ह येथे एसएसटीची मोठी कारवाई, 10.8 कोटींचे विदेशी चलन केले जप्त

मरीन ड्राईव्ह येथे एसएसटीची मोठी कारवाई,  10.8 कोटींचे विदेशी चलन केले जप्त

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीआधी सर्व यंत्रणा राज्यात होणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. निवडणुका लक्षात घेता संपूर्ण राज्यात एसएसटीला नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी मुंबई एसएसटीने 10.8 कोटींच्या विदेशी चलन जप्त केले आहेत. तपास पथकाने मुंबई मरीन ड्राईव्ह येथे एका संशयित कारला पकडले आणि तपासणी केली. त्यावेळी तपासात मोठ्या प्रमाणात विदेशी चलन सापडले आहे. या घटनेची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कारमधून जप्त करण्यात आलेल्या चलनात यूएस आणि सिंगापूर डॉलरसह अनेक देशांच्या चलनांचा समावेश आहे. चलनासह पकडलेल्या व्यक्तीने बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेची कागदपत्रे सादर केली असून, विमानतळावरून हे चलन मिळाले असून ते बँकेत नेत असल्याचा दावा केला आहे. कारमधून जप्त करण्यात आलेले चलन मोठ्या प्रमाणात असून ते पुढील तपासासाठी कस्टमकडे सोपवण्यात आले आहे.

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यात 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली असून तपास यंत्रणांचे राज्यात होणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sharad Pawar interview : मविआत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं मोठं वक्तव्य Sharad Pawar interview : मविआत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीवर प्रसारीत झाली आहे.  ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर...
Sharad Pawar interview : महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar Interview: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतानंतर बारामतीत अजित पवारांनी प्रचाराचा ट्रॅक बदलला, आता शरद पवार म्हणतात…
Sharad Pawar Interview: ”अनेक बैठका झाल्या…”, अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत काय झाले? अखेर शरद पवार यांनी सांगितले
केळी आणि सफरचंद एकत्र खाणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गद्दारांचे; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
‘पढेंगे तो बढेंगे’, भाजपच्या बटेंगे तो कटेंगेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर