मंजुलिका- बाजीराव सिंघममध्ये आज टशन, भुलभुलैया 3 आणि सिंघम अगेन होणार रिलीज

मंजुलिका- बाजीराव सिंघममध्ये आज टशन, भुलभुलैया 3 आणि सिंघम अगेन होणार रिलीज

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आज बॉक्स ऑफिसवर ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुलभुलैया 3’ या बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांची टक्कर होणार आहे. या दोन्ही सिक्वेल चित्रपटांच्या निमित्ताने प्रेक्षकांना ऍक्शन आणि हॉरर कॉमेडी चित्रपटाची मेजवानी मिळणार असून सलग जोडून आलेल्या सुट्टय़ांचा दोन्ही चित्रपटांचा फायदा होणार असला तरी कमाईच्या बाबतीत मंजुलिका बाजी मारणार की बाजीराव सिंघम याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

भुलभुलैया 3 या हॉरर कॉमेडी चित्रपटात कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालन आणि माधुरी दीक्षित झळकणार आहे. अमी जे तोमार या गाण्यावरील त्यांची जुगलबंदी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघींपैकी खरी मंजुलिका कोण, या सस्पेन्सवरून उद्या पडदा हटणार आहे. दुसरीकडे रोहित शेट्टी यांच्या सिंघम अगेन या चित्रपटात अजय देवगण, करिना कपूर यांच्यासोबत अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. विशेष भूमिकेत चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान झळकणार आहे.

तिकिटांचे दर भिडले गगनाला

दोन्ही चित्रपटांचे आगाऊ बुकिंग आता सुरू झाले आहे. मुंबईच्या मैसन पीव्हीआर जिओ वर्ल्ड ड्राईव्ह या सिनेमागृहात सिंघम अगेन या चित्रपटाचे तिकीट 3 हजार रुपयांपर्यंत गेले आहे, तर भुलभुलैया चित्रपटाचे तिकीटही 2250 रुपये असल्याचे दिसत आहे. पुण्यातील पेवेलियन मॉलमध्ये भुलभुलैया 3 चे तिकीट साधारण 500 रुपयांपासून 1700 रुपयांपर्यंत गेल्याचे दिसत आहे, तर सिंघम अगेनची तिकीटे साधारण 500 ते 700 रुपयांपर्यंत गेली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sharad Pawar interview : मविआत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं मोठं वक्तव्य Sharad Pawar interview : मविआत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीवर प्रसारीत झाली आहे.  ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर...
Sharad Pawar interview : महायुतीला लाडक्या बहीण योजनेचा फायदा होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar Interview: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतानंतर बारामतीत अजित पवारांनी प्रचाराचा ट्रॅक बदलला, आता शरद पवार म्हणतात…
Sharad Pawar Interview: ”अनेक बैठका झाल्या…”, अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत काय झाले? अखेर शरद पवार यांनी सांगितले
केळी आणि सफरचंद एकत्र खाणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गद्दारांचे; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल
‘पढेंगे तो बढेंगे’, भाजपच्या बटेंगे तो कटेंगेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर