भाजप उमेदवाराला संतप्त गावकऱ्यांनी वेशीवरच रोखले
मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी वेशीवरच रोखले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सभागृहात एक शब्दही बोलला नाहीत व आमदार म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केले? असा प्रश्नांचा भडिमार गावकऱ्यांनी केला. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून डॉ. तुषार राठोड यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. चार दिवसांपूर्वी मांजरी गावात तुषार राठोड गेले होते. त्या वेळी तेथेही गावकऱ्यांनी गावचा विकास व गावचे प्रश्न मार्गी का लावले नाहीत व पाच वर्षांत आमदार म्हणून कोणते काम केले? असे प्रश्न विचारले.
पाच वर्षांत काय काम केले सांगा… पाच वर्ष आमदार म्हणून तुम्ही कोणते विकासाचे काम केले ते सांगा, असा सवाल मराठा समाजातील तरुणांनी डॉ. राठोड यांना विचारला. मागील निवडणुकीत मराठा समाजाने तुम्हाला मतदान केले. परंतु, तुम्ही मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर सभागृहात एक चकार शब्दही उच्चारला नाही. आमदार म्हणून तुम्ही समाजासाठी काय केले, अशा प्रश्नांच्या फैरी तरुणांनी भाजपा उमेदवारावर झाडल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List