महाराष्ट्र विरोधी पक्षांना मदत करणे, हेच भाजपचे राष्ट्रीय धोरण; संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र विरोधी पक्षांना मदत करणे, हेच भाजपचे राष्ट्रीय धोरण; संजय राऊत यांचा हल्लाबोल

भाजपचा महाराष्ट्रद्वेष अनेकदा दिसून आला आहे. आता महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके तोडण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रविरोधी पक्षांना मदत करणे हेच भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. आता महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके तोडणाऱ्या फडणवीस आणि त्यांच्या गुजराती कंपूचा पराभव करण्याचे मराठी जनतेने निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्याचा कंपूचा पराभव निश्चित आहे, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

जनतेने ठरवले होते की लोकसभेत फडणवीस आणि त्यांच्या कंपूचा पराभव करायचा आणि ते जनतेने करून दाखवले. आता विधानसभेलाही जनतेने फडणवीस आणि कंपूचा पराभव करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. हे सर्व जनभावनेमुळे होत असते. लोकशाहीत जनभावना महत्त्वाची असते. महाराष्ट्र आणि मुंबईचे लचके ताडणाऱ्या फडणवीस आणि त्यांच्या गुजराती कंपूचा पराभव करण्याचे जनतेने ठरवले आहे, हाच आमच्या मराठी जनतेचा आत्मविश्वास आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेची मते कापण्यासाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करण्याचे भाजपचे धोरण आहे. महाराष्ट्रविरोधी पक्षांना मदत करण्याचे भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे. बोगस आधारकार्डद्वारे बोगस नावे मतदारयादीत घुसवत बोगस मदतान करण्याचा उपक्रम भाजपने राबवला आहे, हे अंत्यत गंभीर आहे. याची तक्रार आम्ही वारंवार केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. निवडणुका जाहीर होण्याआधी महायुतीच्या आमदारांकडे 15 ते 20 कोटी रुपये आधीच पोलीस बंदोबस्तात पोहचले आहेत. हेलिकॉप्टरनेही पैसे पोहचवण्यात आले आहे. त्यामुळे आता जे पकडण्यात येत आहे, ती रक्कम किरकोळ असल्याचे दिसून येत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित ठाकरे यांची ताकद दुप्पट, अखेरच्या क्षणी माहीममधून मोठा पाठिंबा अमित ठाकरे यांची ताकद दुप्पट, अखेरच्या क्षणी माहीममधून मोठा पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार...
Devendra Fadnavis : ‘जनतेचा मूड समजायला त्यांना वेळ लागणार’; बटेंगे तो कटेंगे वादावर अजित पवारांना फडणवीसांनी सुनावले
मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
“आम्हा दोघांना लग्नाबाहेर अफेअर करायचं होतं म्हणून..”; कबीर बेदी यांचा पत्नीबाबत खुलासा
लग्नाआधी वन नाइट स्टँड, कपूर कुटुंबातील सुनेची कबुली, दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांना भेटली
हिवाळ्यात दिलासा देणारे फळ, अनेक आजारांवर रामबाण उपाय, फायदे इतके की…
हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात हे पदार्थ, चुकूनही करू नका यांचे सेवन