नांदेड – भोकरमधून शेवटच्या दिवशी दाखल झाले 144 उमेदवारी अर्ज
नांदेडमधील भोकर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 144 उमेदवारांनी 167 नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक उमेदवारी अर्ज भरलेला भोकर हा मतदारसंघ ठरला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने तिरुपती कोंढेकर हे या मतदारसंघातून उमेदवार आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत 144 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात हा मतदारसंघ पहिला ठरला आहे. इतर कुठल्याही मतदारसंघात एवढे उमेदवार उमेदवारी अर्ज भरलेले नाहीत. उद्या 30 ऑक्टोबरला या मतदारसंघात या 144 उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री, भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या महायुतीकडूननिवडणूक लढवत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List