दिवाळीत फटाके रात्री 10 पर्यंतच
प्रदूषण नियंत्रणासाठी दिवाळीत रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवा आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी असे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय फटाके कमी आवाज करणारे, कमी प्रदूषण करणारेच वाजवावेत, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच पर्यावरणाचेदेखील नुकसान होते. यातच मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. आता दिवाळीत मोठय़ा प्रमाणात वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ही समस्या गंभीर होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईकरांना फटाके वाजवताना प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
अशी आहे नियमावली
n ध्वनी विरहित फटाक्यांना प्राधान्य द्यावे.
n कमीत कमी वायू प्रदूषण करणारे फटाके फोडावेत.
n तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे.
n सुरक्षिततेस सर्वेच्च महत्त्व द्यावे.
n गर्दीची ठिकाणे, अरुंद गल्लीत फटाके फोडू नयेत.
n फटाके फोडताना मुलांसोबत मोठय़ा व्यक्तींनी रहावे.
n पाण्याने भरलेली बादली, वाळू आदी जवळ ठेवा.
n कोरडी पाने, कागद किंवा इतर सामुग्री जाळू नये.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List