धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाविषयी समजताच अशी होती ईशा देओलची प्रतिक्रिया
अभिनेते धर्मेंद्र यांची 1970 मध्ये ‘तुम हसीं मै जवां’ या चित्रपटाच्या सेटवर ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी पहिली भेट झाली होती. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या धर्मेंद्र यांनी विवाहित असतानाही 1080 मध्ये दुसरं लग्न केलं. आजही हे दोघं विवाहित आहेत. मात्र धर्मेंद्र हे त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत राहतात. तर हेमा मालिनी या वेगळ्या राहतात. धर्मेंद्र आणि हेमा यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. या दोघींना लहानपणी त्यांच्या वडिलांच्या पहिल्या लग्नाविषयी माहीत नव्हतं. ज्यावेळी तिला याविषयी समजलं ती फक्त चार वर्षांची होती. हेमा मालिनी यांच्या ‘हेमा मालिनी: बियाँड द ड्रीम गर्ल’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ईशा चौथीत असताना तिच्या वर्गातल्या एका मुलाने तिला विचारलं, “तुला दोन आई आहेत ना?” हे ऐकून तिला मोठा धक्काच बसला होता. हा किस्सा सांगताना ईशा म्हणाली, “मी लगेचच त्याला मुलाला म्हटलं की काय मूर्खासारखं बोलतोय. मला एकच आई आहे. त्यादिवशी शाळेतून घरी आल्या आल्या मी माझ्या आईला त्याबद्दल विचारलं होतं. मला असं वाटतं की त्याक्षणी आईने मला सगळं खरं सांगायचं ठरवलं होतं. त्यावेळी मी फक्त चौथीत होते आणि मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण आताची मुलं खूप स्मार्ट आहेत. त्यावेळी मला आईने सांगितलं होतं की बाबांचं आणखी एक कुटुंब आहे.”
“तेव्हा मला समजलं होतं की माझ्या आईने एका अशा व्यक्तीशी लग्न केलंय, ज्याचं आधीच एक लग्न झालेलं होतं आणि त्यांची एक वेगळं कुटुंबसुद्धा आहे. पण प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला त्याबद्दल कधीच वाईट वाटलं नाही. आजपर्यंत मला त्यात काहीच चुकीचं वाटत नाही. याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या पालकांना देईन की त्यांनी आम्हाला कधीच त्याबद्दल अन्कम्फर्टेबल वाटू दिलं नाही,” असं ईशा पुढे म्हणाली.
धर्मेंद्र हे दररोज त्यांच्या घरी यायचे आणि जेवायचे, पण ते घरीच थांबायचे नाही, असंही तिने या आत्मचरित्रात सांगितलं आहे. “बाबा कधी आमच्यासोबत राहिले तर मला आश्चर्य वाटायंच की सर्वकाही ठीक आहे ना? मी लहान असताना माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी पाहायचे की त्यांच्यासोबत त्यांचे आई-बाबा दोघं असायचे. तेव्हा मला जाणवलं की वडिलांनीही सोबत राहणं सर्वसामान्य आहे. आम्हाला कुठेतरी अशा पद्धतीने लहानाचं मोठं केलंय, जिथे अशा गोष्टींचा काही फरक पडला नाही. मी आईसोबत खुश होते आणि माझं वडिलांवरही खूप प्रेम आहे”, असं ईशाने स्पष्ट केलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List