Maharashtra Election News LIVE : उमेदवारी अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर
महायुतीच्या जागवाटपाच्या मुद्यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत. कालचा त्यांचा दौरा रद्द झाला होता, मात्र आज ते पुन्हा राजधानीत जाणार असून उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. राज्यात मविआ आणि महायुती च्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे पक्ष , काँग्रेस, राष्ट्रवादी , शरद पवार पक्ष यांना प्रत्येकी ८५ जागांचे वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती तर उर्वरित 33 जागांसाठी पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिवडीची उमेदवारी अजय चौधरी की सुधीर साळवींना ? असा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर असून आज ते यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या राजकीय बातम्या, तसेच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List