NCP Ajit Pawar Candidate List : अजितदादांच्या पहिल्या यादीत नवाब मलिक वेटिंगवर; तिकीट मिळणार की नाही?

NCP Ajit Pawar Candidate List : अजितदादांच्या पहिल्या यादीत नवाब मलिक वेटिंगवर; तिकीट मिळणार की नाही?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय बंगल्यावर आपल्या पक्षाच्या विद्यमान आमदारांना बोलावलं होतं. अजित पवारांच्या आदेशानुसार अनेक आमदारांनी देवगिरी बंगल्यावर जावून त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी आपल्या आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी आमदारांना एबी फॉर्म दिल्याची बातमी ताजी असतानाच आता अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाने जाहीर केलेल्या यादीत मुंबईतून कुणालाच उमेदवारी देण्यात आलेली नाही. या यादीत सर्व मातब्बर नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पण नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे अजितदादा यांनी नवाब मलिक यांना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मलिक यांना तिकीट मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे.

चार महिलांना संधी

अजित पवार हे लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही ही योजना आणल्याचं सांगत आहेत. त्यासाठीची पुरेशी तरतूद करण्यात आल्याचंही अजितदादा सांगत आहेत. मात्र 38 उमेदवारांच्या पहिल्या यादीत फक्त चारच महिलांना तिकीट देण्यात आलं आहे. आदिती तटकरे, सरोज अहिरे, सुलभा खोडके आणि निर्मला विटेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.

NCP Ajit Pawar Candidate List

NCP Ajit Pawar Candidate List

दोन दिवस भेटींचा

दरम्यान, आपल्यालाच तिकीट मिळावं म्हणून अनेक इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. अनेक नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून अजितदादा यांची भेट घेतली होती. यातील बहुतेकांना अजितदादांनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे भेट सफल झाल्याचा आनंद या इच्छुकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

NCP Ajit Pawar Candidate List

NCP Ajit Pawar Candidate List

‘या’ नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट

  • १. राजेश विटेकर – परिषद आमदार (इच्छुक)
  • २. संजय बनसोडे
  • ३. चेतन तुपे
  • ४. सुनील टिंगरे
  • ५. दिलीप वळसे पाटील
  • ६. दौलत दरोडा
  • ७. राजेश पाटील
  • ८. दत्तात्रय भरणे
  • ९. आशुतोष काळे
  • १०. हिरामण खोसकर
  • ११. ⁠नरहरी झिरवळ
  • १२. ⁠छगन भुजबळ
  • १३. ⁠भरत गावित – एबी फॅार्म दिला
  • १४. ⁠बाबासाहेब पाटील
  • १५. ⁠अतुल बेनके
  • १६. ⁠नितीन पवार
  • १७. ⁠इंद्रनील नाईक
  • १८. ⁠बाळासाहेब आजबे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अनेक जण भारतात राहत असले तरी देखील ते वेगनेगळ्या देशांचे...
उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका, शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा: मल्लिकार्जून खर्गे
‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी