प्रसिद्ध माफिया लखन भैय्याचा भाऊ माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांविरोधात निवडणूक लढणार

प्रसिद्ध माफिया लखन भैय्याचा भाऊ माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांविरोधात निवडणूक लढणार

मोहन देशमुख, इनपूट एडिटर, टीव्ही ९ मराठी : प्रसिद्ध माफिया लखन भैय्या याचा भाऊ हे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ज्याला प्रसिद्ध माफिया लखन भैयाच्या भावाने विरोध केला आहे. लखन भैय्याचा भाऊ वकील आरव्ही गुप्ता यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदीप शर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला विधानसभेचे तिकीट देऊ नये, असे आवाहन करणारा व्हिडिओ जारी केला आहे.

प्रदीप शर्मा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाला तिकीट मिळाले तर मी त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे लखन भैय्या यांच्या भावाने सांगितले होते. प्रदीप शर्मा यांच्यावर लखन भैय्याच्या फेंक इनकाउंटरचा केल्याचा आरोप लखन भैय्या याच्या भावाने केला होता.

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वकृती शर्मा यांनी जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत त्यांच्या मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. क्षितिज हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात प्रदीप शर्मांनी निवडणूक लढवली होती.

प्रदीप शर्मा यांचे 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित केले होते. पण 2017 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 35 वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द सोडून त्यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. 2019 मध्ये त्यांनी नालासोपारा येथून निवडणूक लढवली होती. पण बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा पराभव केला होता.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे मूळचे यूपीचे आहेत. पण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे महाराष्ट्रातील धुळ्यात वास्तव्यास होतं. 1983 मध्ये ते पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ३१२ गुन्हेगारांचा सामना केला म्हणून ते एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले. प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती.

लखन भैय्या कोण होता?

रामनारायण गुप्ता उर्फ ​​लखन भैय्या हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा मानला जात होता. रामनारायण यांचे भाऊ रामप्रसाद गुप्ता हे पेशाने वकील होते. ते 1999 पर्यंत कोर्टात प्रॅक्टिस करत होते. लखन भैयाला पोलीस जेव्हा घेऊन गेले तेव्हा राम प्रसाद यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तार पाठवला. राम प्रसाद यांनी सांगितले की, त्यांच्या भावाचे अपहरण करण्यात आले असून पोलीस लखनचा एन्काऊंटर करु शकतात. त्याच दिवशी संध्याकाळी भावाच्या एन्काउंटरची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांना कोर्टात याचिका दाखल केला. त्यानंतर सत्र न्यायालयात खटला चालला आणि 2013 मध्ये प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र, या प्रकरणात 13 पोलीस दोषी आढळले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने...
Shah Rukh Khan Threat: अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’
भाजपने डॉग स्क्वाड बागळलेत; जयंत पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला
इन्स्टाग्राममुळे सापडली वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस! पोलिसांनी शेतकऱ्याला दिला 8 दिवसांचा वेळ
मुंडे बहीण-भावानं आमची कोट्यवधींची जमीन हडपली! प्रवीण महाजन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ
काँग्रेसनं बंडोबांना ‘पंजा’त पकडलं; मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंडखोर 6 वर्षांसाठी निलंबित!
आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका