मुंबईत कोण वरचढ ठरेल? कोणत्या भागात कोणत्या भाषिक मतदारांचा वरचष्मा

मुंबईत कोण वरचढ ठरेल? कोणत्या भागात कोणत्या भाषिक मतदारांचा वरचष्मा

मुंबईत भाषेनुसार आमदारांचं गणित बघितल्यास 2019 ला शिवसेनेचे 14 पैकी 14 आमदार मराठी होते. भाजपात 16 पैकी 10 मराठी, 4 गुजराती, 1 उत्तर भारतीय आणि 1 तमिळ भाषिक आमदार जिंकून आले. उमेदवार आणि पक्षीय मतं सोडली तर गुजराती किंवा उत्तर भारतीय बहुल भागामध्ये शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीचा फायदा झाला., तर भाजपच्या उमेदवारांना पूर्ण मराठी बहुल भागात शिवसेनेच्या संघटनेचा लाभ मिळाला. बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व, घाटकोपर पश्चिम, अंधेरी पश्चिम इथं भाजपचे 5 मराठी आमदार जिंकून आले.
या भागात भाषिक मतदारांचा क्रम बघितल्यास बोरिवलीत गुजराती नंतर मराठी, दहिसरमध्ये मराठी नंबर दोनवर गुजराती, कांदिवली पूर्वेत गुजराती-मराठी, घाटकोपर पश्चिममध्ये गुजराती-मराठी आणि अंधेरी पश्चिममध्ये मराठी-गुजराती यानंतर उत्तर भारतीय आणि मुस्लिमांची मतं निर्णायक होती.

शिवसेना वरळी, शिवडी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व या मराठी मतदार निर्णायक असलेल्या विधानसभांमध्ये विजयी राहिली. भाजपचे अमराठी आमदार जिंकून आलेल्या भागांमध्ये घाटकोपर पूर्व, मुलुंड, चारकोप, मलबार हिल,
गोरेगाव आणि सायन कोळीवाड्याचा समावेश आहे. इथून अनुक्रमे भाजपचे ३ गुजराती, एक उत्तर भारतीय आणि एक तमिळभाषिक आमदार जिंकून आले. त्यापैकी मुलुंडमधलं भाषिक गणित गुजराती नंतर मराठी असं आहे. चारकोपमध्ये मराठी-गुजराती….मलबार हिलमध्ये गुजराती, उत्तर भारतीय, त्यानंतर मराठी, गोरेगावात मराठी नंतर गुजराती. सायन कोळीवाड्यात दक्षिण भारतीय, मराठी त्यानंतर पंजाबी मतं निर्णायक ठरतात.

  • मुंबईतल्या 36 मतदारसंघावर क्रमवारीनुसार कोणत्या भाषिक मतदारांचं प्रभूत्व?वरळी, शिवडी, कलिना, चेंबूर, दिंडोशी, विक्रोळी, भांडूप पश्चिम, अंधेरी पूर्व, मागाठणे, जोगेश्वरी पूर्व, वडाळा या 10 मतदारसंघात मराठी बहुल मतदार सर्वाधिक आहेत.
  • बोरीवली, कांदिवली पूर्व, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मुलुंड आणि मलबार हिल या 5 ठिकाणी
    पहिल्या स्थानी गुजराती त्यानंतर मराठी मतं महत्वाची ठरतात.
  • दहिसर, कुलाबा, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, चारकोप आणि गोरेगाव या 6 ठिकाणी मराठी आणि दुसऱ्या स्थानी गुजराती मतं निर्णायक आहेत.
  • कुर्ला, माहिम, धारावी, मालाड पश्चिम, वांद्रे पूर्व, वर्सोवा, वांद्रे पश्चिम इथं पहिल्या स्थानी मराठी, नंतर मुस्लिम मतदार
    महत्वाची आहेत.
  • मुंबादेवी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, आणि भायखळा या 4 ठिकाणी मुस्लिम आणि मराठी मतं निकालात महत्वाची ठरतात.
  • चांदिवलीत मराठी अधिक उत्तर भारतीय., आणि सायन कोळीवाड्यात दक्षिण भारतीय अधिक मराठी मतांचं प्राबल्य आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने...
Shah Rukh Khan Threat: अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’
भाजपने डॉग स्क्वाड बागळलेत; जयंत पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला
इन्स्टाग्राममुळे सापडली वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस! पोलिसांनी शेतकऱ्याला दिला 8 दिवसांचा वेळ
मुंडे बहीण-भावानं आमची कोट्यवधींची जमीन हडपली! प्रवीण महाजन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ
काँग्रेसनं बंडोबांना ‘पंजा’त पकडलं; मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंडखोर 6 वर्षांसाठी निलंबित!
आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका