बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी या व्यक्तीने दिली होती सुपारी, तपासात मोठा खुलासा

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी या व्यक्तीने दिली होती सुपारी, तपासात मोठा खुलासा

Baba Siddique Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी गोळीबार करणारे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होते, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. अनमोलच्या संपर्कात राहण्यासाठी आरोपी मेसेजिंग ॲप स्नॅपचॅट अकाउंटचा वापर करत होते. पण या हत्येमागील हेतू अद्याप समोर आलेला नाही. वृत्तसंस्था एएनआयने मुंबई क्राईम ब्रँचच्या हवाल्याने म्हटले आहे की, संशयित तीन शूटर्सनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यापूर्वी तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी स्नॅपचॅटद्वारे संपर्क साधला होता.

दसऱ्यानिमित्त फटाके फोडत असताना मुलगा जीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. एका फेसबुक पोस्टद्वारे, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने दावा केला आहे की, अभिनेता सलमान खानशी त्याचे जवळचे संबंध आणि दाऊद इब्राहिम सारख्या अंडरवर्ल्ड व्यक्तींशी कथित संबंधांमुळे त्याची हत्या करण्यात आलीय. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती.

अनमोल हा कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका निवेदनात म्हटले आहे की, “आरोपी स्नॅपचॅटच्या माध्यमातून एकमेकांसोबत संपर्क साधत होते. सूचना मिळाल्यानंतर ते मेसेज तात्काळ डिलीट करायचे. अटक केलेल्या आरोपींचे स्नॅपचॅट मेसेज जवळून तपासले असता, गोळीबार करणारे आणि सूत्रधार प्रवीण लोणकर हे अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल राजस्थानमधून आणले होते. पिस्तुल आणणाऱ्या आरोपींना ही अटक करण्यात आलीये. राम कनोजिया आणि भागवत सिंग, ओम सिंग यांनी हत्येसाठी वापरलेली तीन पिस्तुलांपैकी दोन राजस्थानातून आणली होती. दोन्ही पिस्तुल हे परदेशात बनवलेल्या आहेत. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात सिद्दिकी यांच्या हत्येसाठी ती वारपली गेली होती.

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा करत आहे. त्यांनी आतापर्यंत १० लोकांना अटक केली आहे. ज्यात हरियाणाचा रहिवासी गुरमेल सिंग आणि उत्तर प्रदेशचा रहिवासी धर्मराज कश्यप या दोन कथित शूटरचा समावेश आहे. तिसरा शूटर शिवकुमार गौतम हा खुनाच्या कटात सहभागी असलेल्या इतर काही लोकांसह फरार आहे.

चौकशीत असे समोर आले की, कनोजिया आणि सिंग हे तीन महिन्यांपूर्वी पिस्तूल घेण्यासाठी राजस्थानला गेले होते. सिंग हा मूळचा उदयपूर, राजस्थानचा रहिवासी असून अटकेवेळी तो नवी मुंबईत भंगाराचा व्यवसाय करत होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल ही अभिनेत्री भारतीय नाही तर अमेरिकेची नागरिक, त्या पोस्टमुळे झाली पोलखोल
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. अनेक जण भारतात राहत असले तरी देखील ते वेगनेगळ्या देशांचे...
उडता पंजाबसारखी महाराष्ट्राची अवस्था होऊ देऊ नका, शिंदे भाजपाच्या चोरांच्या सरकारला घरी बसवा: मल्लिकार्जून खर्गे
‘सर्व औषधे मोफत, महाराष्ट्रातील जनतेला 25 लाखांचा विमा’, मल्लिकार्जुन खर्गे यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
महाविकास आघाडीकडून लाडक्या भावांना मोठं गिफ्ट, दर महिन्याला इतके हजार मिळणार, उद्धव ठाकरेंची घोषणा
जातीनिहाय जनगणना करू आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू – राहुल गांधी
महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार… बसमध्ये प्रवास फ्रि; राहुल गांधी यांनी दिली महागॅरंटी