आता यूटय़ूबवर फक्त ओरिजिनल व्हिडीओ चालणार, एआय फेक व्हिडीओला बाहेर फेकणार
आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वाढत्या वापरामुळे फेक कंटेंटला पूर आला आहे. यूटय़ूबवरही एआय व्हिडीओंचे प्रमाण वाढलेय. युजर्संना समजत नाही की व्हिडीओ खरा आहे की, एआयच्या मदतीने बनवला गेला आहे. आता यूटय़ूबने या समस्येवर उपाय शोधला आहे. यूटय़ूबने ‘कॅप्चर विथ अ कॅमेरा’ हे फीचर आणले आहे. या फीचरमुळे तुम्ही पाहत असलेला व्हिडीओ एआय टूलच्या मदतीने तयार केलेला आहे का, ते लगेच समजेल. यामुळे यूटय़ूबवर बनावट कंटेंट ओळखणे सोपे करेल. ज्या युजर्संना मूळ कंटेंट दाखवायची किंवा पाहण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी ‘कॅप्चर विथ अ कॅमेरा’ फीचर फायदेशीर ठरेल. नवीन फीचर आल्यानंतर क्रिएटर्सना व्हिडीओ अपलोड करताना कोणतेही विशेष बदल करावे लागणार नाहीत. यूटय़ूबचे अल्गोरिदम आपोआप तो व्हिडीओ स्कॅन करेल आणि त्याला ‘कॅप्चर विथ अ कॅमेरा’ असा टॅग देईल. व्हिडीओमधील मेटाडेटा पूर्णपणे बरोबर असल्यास हे फीचर आपोआप ऑक्टिव्ह होईल. व्हिडीओ अपलोड करताना क्रिएटरला व्हिडीओबद्दल माहिती टाकण्याचीही सुविधा युटय़ूबकडून देण्यात आली आहे.
हे फायदे होतील
एआयच्या मदतीने अनेक बनावट व्हिडीओ बनवले जात आहेत. एआयच्या मदतीने डीपफेक व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात, जे अगदी खरे दिसतात. सामान्य माणूस त्यांना ओळखू शकत नाही. एआयच्या मदतीने केवळ चेहराच नव्हे तर आवाजाचीही हुबेहुब कॉपी करता येते. ‘कॅप्चर विथ अ कॅमेरा’ फीचरने व्हिडीओची विश्वासार्हता वाढेल. व्हिडीओ खरा की खोटा हे युजर्संना समजेल. चुकीची माहिती आणि खोटय़ा बातम्या ओळखणे सोपे होईल़
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List