धनगर आरक्षणावरून महायुतीत वाद; अजित पवार गटाच्या आमदाराचा विरोध

धनगर आरक्षणावरून महायुतीत वाद; अजित पवार गटाच्या आमदाराचा विरोध

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास उग्र स्वरूपाच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे. सरकारने आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

राज्यामध्ये सध्या मराठा, धनगर, मुस्लिम अशा विविध समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. त्यातच धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र आता सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांनीच याला विरोध सुरू केला आहे. धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर सरकारच्या विरोधातच उग्र स्वरूपाचा आंदोलन केले जाईल, असा इशारा अकोले येथील आमदार लहामटे यांनी दिला आहे.

लहामटे म्हणाले की, ‘धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा ज्यांनी कोणी निर्णय घेतला, त्याचा मी निषेध करतो. आदिवासी समाजाला घटनात्मक आरक्षण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. त्यामध्ये 47 जमातींना आरक्षण देण्यात आले आहे. त्यात कोणाचाही समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेची कोणीही पायमल्ली करू नये. धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर स्वतंत्र द्या. धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबध नाही, त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे. त्यामुळे सरकार असा का विचार करतयं? किंवा काही संघटनांना का वाटतय आदिवासी समाजात आरक्षण मिळावं? असा प्रश्नही लहामटे यांनी उपस्थित केला. ‘सरकारने आदिवासी समाजाला कायदा हातात घ्यायला लावू नये. धरणासाठी जमीनी आम्ही दिल्या. शोषण आमच झालय. घटनेने आम्हाला जे आरक्षण दिलं आहे, त्यावर जर इतरांचा डोळा असेल तर ते चालणार नाही, असे म्हणत लहामटे यांनी सरकारला एक प्रकारे ताकीद दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण… महायुतीचा शिवडीत मोठा गेम, भाजपचा अधिकृतपणे राज ठाकरेंना पाठिंबा जाहीर, पण…
मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण निवडणूक लढवेल? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. कारण भाजप नेते आशिष शेलार यांनी आजच्या...
नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवा या 5 औषधी वनस्पती
महाराष्ट्र पायपुसणे नाही, राज्यातून तुमचे नामोनिशाण मिटवून टाकू; उद्धव ठाकरे कडाडले
बुलेट ट्रेनसाठी बांधकाम सुरू असताना पुल कोसळला; तीन मजूर काँक्रीटच्या ब्लॉकखाली दबले
दहा वर्ष डेट अन् नंतर लग्न; पण हनिमूनच्या मुलीला असं काही समजलं की बसला जबरदस्त धक्का
बॉलिवूडला केले बाय-बाय, या अभिनेत्रीने ज्वॉईन केली गुगलमध्ये नोकरी