माफी मागणार नाही, सनातनवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; उदयनिधी स्टॅलिन भूमिकेवर ठाम
तामिळनाडूच्या द्रमुक सरकारमधील उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलीन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उदयनिधी स्टॅलीन यांनी ‘सनातन धर्मा’वर भाष्य केले होते. सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवर उदयनिधी स्टॅलीन यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. माझ्या टिप्पण्यांचा उद्देश महिलांवरील अत्याचारी प्रथांना संबोधित करणे हा आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे स्पष्ट मत स्टॅलीन यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. सनातन निर्मूलन परिषदेत उदयनिधी यांनी सनातन धर्मावर वक्तव्य केले होते. ‘फक्त सनातनला विरोध करणे चूक आहे. त्यापेक्षा ते संपवले पाहिजे. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्यामुळे काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोना सारख्या आजाराला विरोध करू शकत नाही. त्यामुळे आपण त्या मूळापासून संपवण्याचा प्रयत्न करतो. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे, असे वक्तव्य उदयनिधी यांनी केले होते.
उदयनिधी हे तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री असून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन यांचे पुत्र आहेत. सोमवारी एका कार्यक्रमात उदयनिधी यांनी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. मी पेरियार, माजी मुख्यमंत्री सीएन अण्णादुराई आणि एम करुणानिधी यांसारख्या द्रमुक नेत्यांच्या मतांशी सहमत आहे. आधीच्या काळी महिलांना शिक्षण घेऊ दिले जात नव्हते. तिला घर सोडता येत नव्हते आणि नवऱ्याचे निधन झाल्यावर तिलाही मरावे लागत होते. थंथाई पेरियार यांनी सगळ्याच्या विरोधात भाष्य केले होते. मी पण त्याच गोष्टींचे समर्थन करतोय. पेरियार, अण्णा आणि कलैगनर जे बोलत राहिले तेच मी पुन्हा पुन्हा सांगितोय. पण माझ्या शब्दांचा विपर्यास झाला. असे ते यावेळी म्हणाले.
माझ्यावर केवळ तामिळनाडूतच नाही तर देशभरातील अनेक न्यायालयांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. मला माफी मागण्यास सांगण्यात आले. पण तरीही मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. मी कलैगनरचा नातू आहे आणि मी माफी मागणार नाही, असे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टिलीन म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List