भोसरीने महाराष्ट्राला दमदार कुस्तीपटू दिले.. भोसरीचा यात्रा उत्सव म्हणजे क्रीडा पर्वणीच : आढळराव पाटील
भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा
शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
शिरूर : शिरूर लोकसभेतुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी नुकतीच भोसरी गावच्या यात्रा उत्सवात कुस्ती आखाड्यात हजेरी लावली. यावेळी भोजापूर येथील कुस्ती आखाडा येथे भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा निमित्त आयोजित कुस्तीचे थरार अनुभवले. प्रचंड संख्येने उपस्थित कुस्ती शौकिनांनी आढळराव पाटील यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी आढळरावांना कुस्तीप्रेमी नागरिकांशी संवाद साधताना म्हंटले की, भोसरी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे बैलगाडा आणि दुसरीकडे कुस्ती आखाडा. महाराष्ट्राला अनेक दमदार कुस्तीपटू भोसरी गावाने दिले आहे. कुस्ती हा आपला ग्रामीण भागातला रांगडा खेळ आहे. मातीशी असलेली घट्ट नाळ भोजापुर नागरीने आजही टिकवून ठेवली आहे, याचा अभिमान आहे म्हणूनच भोसरीची यात्रा म्हणजे सर्व नागरिकांसाठी क्रीडा पर्वणीच असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List