महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोकसभा निवडणुकीत महायुतीची प्रचारात आघाडी
लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे.
वाघोली : लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शुक्रवारी हडपसर विधानसभा मतदार संघाचा दौरा केल्यानंतर आज वाघोली – शिरूर विधानसभा मतदार संघातील वाघोली परिसरात दौरा केला.
वाघोलीतील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आजच्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ड्रीम संकल्प सोसायटी येथे जावून स्थानिकांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून महायुतीच्या विजयासाठी आशिर्वाद घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त केसनंद फाटा येथे जावून वाघोलीचे उपसरपंच मारुती भगवंत गाडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी बीजेएस महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत शिवाजीराव अढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यअहवाल वाटपादरम्यान, ”घड्याळ तेच, वेळ नवी” अशी घोषणा करत उपस्थित समस्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांना प्रचंड बहूमातांनी, महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला.
त्यानंतर ऑक्सीव्हॅली-२, नियती वेलान सोसायटी येथील रहिवाश्यांची भेट घेतली. स्थानिकांशी संवाद साधत असता, येथील पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या व इतर समस्यांवर चर्चा करत, त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन देखील अढळराव पाटलांनी त्यांना दिले.
यावेळी पुणे जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद, स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List