मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अधिक जोमाने प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List