पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं….
पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींनी त्यांचे दु:ख, राग , संताप व्यक्त केला आहे. सर्वांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. अशावेळी अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. आता याबाबत आमिर खानने घेतलेला निर्णय चर्चेत आला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय
आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ साठी हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण आता तो काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दुःखी आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरच्या आधी सलमान खाननेही त्याचा एक दौरा पुढे ढकलला आहे. सलमान अनेक स्टार्ससोबत युके दौरा करणार होता, पण पहलगाम हल्ल्यामुळे तोही पुढे ढकलण्यात आला.
चित्रपटात तोच भावनिक संदेश असेल
‘सितारे जमीन पर’ हा आमिर खानच्या 2007 मध्ये आलेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. तथापि, यावेळी कथा आणि पात्रे वेगळी असतील. चित्रपटात तोच भावनिक संदेश असेल आणि सामाजिक जाणीव कायम राहणारी खास कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा अशा व्यक्तीचा प्रवास दाखवते जो मुलांना भेटून जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. आमिर खानच्या मते, हा भावनिक प्रवास प्रेक्षकांना त्याच प्रकारे स्पर्श करणार आहे ज्याप्रमाणे ‘तारे जमीन पर’ने केला होता.
ही वेळ योग्य नाही ….
या चित्रपटाचा ट्रेलर या आठवड्यात लाँच होणार होता. लाँच इव्हेंटची सर्व तयारी पूर्ण झाली होती, परंतु इंडस्ट्रीतील सूत्रांनी सांगितले की आमिर खान आणि त्याच्या टीमला असे वाटले की यावेळी ट्रेलर लाँच करणे योग्य नाही. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात अनेक जण जखमीही झाले. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
नवीन तारीख कधी जाहिर होईल याबद्दल माहिती नाही
आमिर खानच्या या चित्रपटाचा ट्रेलर आता पुन्हा कधी प्रदर्शित होईल याबद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परिस्थिती सामान्य झाल्यावर त्याची नवीन रिलीज तारीख जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले आहे. आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिर आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List