आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…

आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये, खडतर आयुष्याबद्दल म्हणाली…

Bollywood Actress Life: ‘हे ही दिवस जातील…’, ही म्हण आयुष्यातील चांगल्या वाईट दिवसांसाठी लागू होते. आयुष्यात आनंद – दुःख, चांगले – वाईट क्षण येत जात राहतात आणि त्यानंतर राहतात त्या मात्र फक्त आणि फक्त आठवणी… सामान्य माणसांना वाटतं आपल्या आयुष्यात फार अडचणी आहेत, पण सेलिब्रिटींना देखील आयुष्याच्या एका टप्प्यावर अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री श्रृती हासन हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. आई – वडीलांचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

श्रृती हासन हिच्या आई – वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, सुपरस्टार कमल हासन आणि सारिका यांनी ती मुलगी आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्रृतीने आई – वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आयुष्य कशापद्धतीनं क्षणात बदललं याबद्दल सांगितलं आहे.

श्रृती हासन म्हणाली, ‘आई – वडिलांच्या घटस्फोटानंतर आयुष्य बदललं आणि मी परिस्थिती नम्रपणे स्वीकारली. घटस्फोटानंतर जेव्हा आम्ही चेन्नईतून मुंबईत आलो तेव्हा एका महलातून दुसऱ्या महलात आल्यासारखं आयुष्य राहिलं नव्हतं. मुंबईत राहणं फार सोपं नव्हतं. पण आनंदाने मी सर्वकाही स्वीकारलं. मर्सिडीजमधून मुंबई लोकलमध्ये प्रवास करणं… आयुष्यातील फार मोठा बदल होता. या दोन्ही प्रवासातून आपण कसे शिकू शकतो हे मला जाणवलं. ‘

स्वतःमध्ये असलेल्या एटीट्यूडबद्दल देखील अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यामध्ये एटीट्यूड होता. पण यासाठी नाही की मी स्वतःला इतरांपेक्षा योग्य समजत होती. उलट मला माझ्यातील आत्मविश्वास कमी वाटत होता.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

श्रृती हसन हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 2000 मध्ये बालकलाकर म्हणून अभिनेत्रीने अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर 2009 मध्ये अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2011 मध्ये अभिनेत्रीने Anaganaga O Dheerudu तेलुगू सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रृती हासन हिने दिल तो बच्चा है जी, रमैया वस्तावैया, तेवर, गब्बर इज बैक, वेलकम बैक, रॉकी हैंडसम, बहन होगी तेरी, देवी यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेविश्वात सक्रिय आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं…. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा मोठा निर्णय,बॉलिवूड एकवटलं….
पहलगाम हल्ल्यानंतर जवळपास सगळ्याच सेलिब्रिटींनी त्यांचे दु:ख, राग , संताप व्यक्त केला आहे. सर्वांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे....
नॅनोटेक्नॉलॉजी आणि कोव्हिडवर पतंजलीचा रिसर्च; ही माहिती आली समोर
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या अ‍ॅक्शनने पाकिस्तनाला हादरा, 70 हजार कोटींचं नुकसान
कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी
सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
IND vs SA Women – सामना हातातून निसटलाच होता! स्नेह राणाने पंजा फिरवला अन् टीम इंडियाने विजय साजरा केला
Summer Tips- उन्हाळ्यात बडीशेप खाणे का फायदेशीर आहे? वाचा सविस्तर